भारतात पहिल्यांदाच : ‘गूगल ग्लास’नं हृदय शस्त्रक्रिया

इंटरनेटच्या दुनियेत सर्वोच्च स्थान पटकावणाऱ्या गूगलनं मोबाईल, कॉम्प्युटर आणि लॅपटॉप हे सगळं एकाचवेळी ऑपरेट करणारा गूगल ग्लास तयार केलाय. अनेक क्षेत्रात गूगल ग्लासचा परिणामकारक वापर होऊ शकतो. अगदी ‘हार्ट ऑपरेशन’साठीही... भारतात पहिल्यांदाच नानावटी हॉस्पिटलमध्ये गुगल ग्लासच्या मदतीनं चक्क हृदय शस्त्रक्रिया पार पडली. 

Updated: Jun 28, 2014, 11:48 AM IST
भारतात पहिल्यांदाच : ‘गूगल ग्लास’नं हृदय शस्त्रक्रिया title=

मुंबई : इंटरनेटच्या दुनियेत सर्वोच्च स्थान पटकावणाऱ्या गूगलनं मोबाईल, कॉम्प्युटर आणि लॅपटॉप हे सगळं एकाचवेळी ऑपरेट करणारा गूगल ग्लास तयार केलाय. अनेक क्षेत्रात गूगल ग्लासचा परिणामकारक वापर होऊ शकतो. अगदी ‘हार्ट ऑपरेशन’साठीही... भारतात पहिल्यांदाच नानावटी हॉस्पिटलमध्ये गुगल ग्लासच्या मदतीनं चक्क हृदय शस्त्रक्रिया पार पडली. 

गुगल ग्लास... तंत्रज्ञानातला लेटेस्ट आविष्कार... गूगल विश्वात नव्याने आलेला गूगल ग्लास लवकरच भारतीय बाजारातही उपलब्ध होणार आहे. गूगल ग्लासची फ्रेम चष्म्यावर लावता येते. हाय रेझोल्यूशनच्या या गूगल ग्लासमधून 8 फूट लांबूनही 25 इंच हाय डेफिनेशन स्क्रीन पाहता येते. 5 मेगापिक्सलचा कॅमेरा, 720 एफपीएस व्हिडिओ शूटिंगही करता येईल. एव्हढंच नव्हे तर तुमच्या कमांडवर हा गूगल ग्लास काम करु शकेल, यासाठी त्यावर बोन इंडक्शन ट्रान्सड्युसर यंत्रणा आहे. तसंच वाय-फाय, 12 जीबी मेमरी, 16 जीबी फ्लॅश असे सर्व फीचर्स गूगल ग्लासमध्ये आहेत.

गूगल ग्लास अजून बाजारात आला नसला तरी लवकरच तो भारतीय बाजारात उपलब्ध होईल. त्याची किंमत 25-30 हजार असणार आहे. पण या गूगल ग्लासवर ऍप्स बनवण्यासाठी हार्ट सर्जन डॉ. पवनकुमार सध्या काम करत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात या गूगल ग्लासचा वापर अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकतो, असा त्यांचा दावा आहे.

ऑपरेशन करतानाचे थेट प्रक्षेपण शक्य असल्यानं विद्यार्थ्यांना शिकवणं सोपे जाईल... एखाद्या एक्सपर्ट ओपिनियनची गरज लागल्यास थेट संपर्क होऊ शकतो तसंच गूगल ग्लास द्वारे हृदयाचे ठोके, तापमान, रक्तदाब याचे अचूक निदान करता येतील, त्यामुळे गूगल ग्लास बहुपयोगी ठरेल यात शंकाच नाही.

नानावटी हॉस्पिटलमध्ये डॉ. पवन कुमार यांनी आज चक्क गूगल ग्लासच्या मदतीनं हार्ट सर्जरी केली. भारतात पहिल्यांदाच अशी सर्जरी करण्यात आली. नवनवीन तंत्रज्ञान तर येतंय. त्याद्वारे अशक्य गोष्टी शक्य होऊ लागल्यात. पण सर्वसामान्य माणसांपर्यंतदेखील त्याचा फायदा पोहोचायला हवा... 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.