मुंबई : एटीएम वापरावर मर्यादा आल्याने जास्त वेळा वापर झाल्यास ग्राहकांना याचा फटका बसणार आहे.
महिन्यातून पाचपेक्षा जास्त वेळा एटीएमचा वापर केल्यास ग्राहकांकडून शुल्क आकारणी करण्यास काही बॅंकांनी सुरुवात केली आहे.
महिन्यातून पाचपेक्षा जास्तवेळा एटीएममध्ये व्यवहार करणाऱया ग्राहकांकडून शुल्कवसुली करण्यास रिझर्व्ह बॅंकेने सर्व बॅंकांना परवानगी दिली आहे.
कार्ड स्वाईपचा वापर
प्रत्येकवेळी एटीएममध्ये जाऊन पैसे काढण्यापेक्षा ग्राहकांनी त्यांच्याकडील डेबिट कार्डच्या माध्यमातून विविध खरेदी करावी. डेबिट कार्ड दुकानदाराकडे स्वाईप करून थेट रोख रकमेचा व्यवहार ग्राहक टाळू शकतात.
नेटबॅंकिंगचा पर्याय
नेटबॅंकिंगचा जास्तीत जास्त वापर करूनही ग्राहक एटीएममध्ये न जाता आपली कामे करू शकतात. नेटबॅंकिंगच्या साह्याने ग्राहक विविध प्रकारची बिलं भरू शकतात. त्याचबरोबर दुसऱयाच्या अकाऊंटमध्ये पैसे पाठवू शकता.
फक्त पैसे काढण्यासाठीच
एटीएमच्या वापरावर निर्बंध घालण्यात आल्यामुळे ग्राहकांनी केवळ पैसे काढण्यासाठीच एटीएमचा वापर करावा. मिनी स्टेटमेंट काढणे, खात्यातील शिल्लक पाहणे, मुदत ठेव करणे इत्यादी सुविधांसाठी एटीएमचा वापर न करता इतर पर्यायांचा विचार करावा.
आर्थिक शिस्त
प्रत्येक आठवड्यात तुम्हाला किती पैशांची गरज आहे, त्याचा अंदाज घ्या. तुम्हाला जेवढे पैसे लागणार आहेत. त्यापेक्षा थोडी जास्तच रक्कम एटीएममधून काढा. यामुळे सारखे सारखे एटीएममध्ये जाण्याची गरज पडणार नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.