मुंबईत लिफ्ट कोसळून एक ठार, दोन जखमी

गिरगावमधील ग्रँट रोड भागातील एका पंधरा मजली इमारतीमधील लिफ्ट कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर चारजण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दुसऱ्या एका इमारतीतील अपघातात एकाचा मृत्यू झाला. 

Updated: Sep 25, 2015, 09:32 AM IST
मुंबईत लिफ्ट कोसळून एक ठार, दोन जखमी title=

मुंबई : गिरगावमधील ग्रँट रोड भागातील एका पंधरा मजली इमारतीमधील लिफ्ट कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर चारजण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दुसऱ्या एका इमारतीतील अपघातात एकाचा मृत्यू झाला. 

ग्रँट रोड परिसरातील व्ही. पी. रोडवर गणेश कृपा या इमारतीची लिफ्ट कोसळून हा अपघात झाला. लिफ्ट कोसळल्याने राजू प्रजापती यांचा मृत्यू झाला. तर या अपघातात दोघे जखमी झालेत. 

तसेच, दुसऱ्या एका घटनेत एका ४१ मजली इमारतीत क्रेनमध्ये अडकून एकाचा मृत्यू झाला. अमृत सोसायटीमध्ये इमारतीचे बांधकाम सुरू आहे. याठिकाणी एका क्रेनमद्ये महेंद्र सिंग अडकलेत. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.