'युतीचं राजकारण पुरे म्हणता, काश्मीरात युती कशी चालते' उद्धव ठाकरेंची खोचक टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज भाजपचे अध्यक्ष अमित शाहांवर जोरदार टीकास्त्र सोडलंय. अमित शाह मुंबईत येऊन युतीचं राजकारण पुरे म्हणतात. पण तिथे काश्मीरात मात्र आझाद काश्मीरवाल्या किंबहूना पाक धार्जिण्यापक्षासोबत युती त्यांना चालते हे एक मोठं आश्चर्य असल्याची खोचक टीका उद्धव ठाकरेंनी केलीय. 

Updated: Jul 23, 2015, 04:48 PM IST
'युतीचं राजकारण पुरे म्हणता, काश्मीरात युती कशी चालते' उद्धव ठाकरेंची खोचक टीका title=

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज भाजपचे अध्यक्ष अमित शाहांवर जोरदार टीकास्त्र सोडलंय. अमित शाह मुंबईत येऊन युतीचं राजकारण पुरे म्हणतात. पण तिथे काश्मीरात मात्र आझाद काश्मीरवाल्या किंबहूना पाक धार्जिण्यापक्षासोबत युती त्यांना चालते हे एक मोठं आश्चर्य असल्याची खोचक टीका उद्धव ठाकरेंनी केलीय. 

सरकार बदललं तरी काश्मीरमध्ये पाकिस्तानी झेंडे कसे फडकतात, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. तसंच राष्ट्रहिताशी कुठलीही तडजोड न करता पाकिस्तानचा मुकाबला करा, असा सल्लाही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला आहे. तर 'अच्छे दिनाचा वायदा आहे, लोकांना फसवता येणार नाही', अशी बोचरी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली आहे.  

शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या 'सामना'मध्ये उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा पहिला भाग छापण्यात आलाय. त्याता उद्धव ठाकरेंनी हे उद्गार काढले आहे. 

तसंच राज्य सरकारनं कर्ममाफी न करण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्यासाठी आम्ही कायम प्रयत्न केलाय आणि तो यापुढेही करत राहू असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.