मुंबई : पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. लोअर परळ येथील यार्डात जाणारा एक्स्प्रेसचा डबा रुळावरुन घसरल्यामुळे ही वाहतूक विस्कळीत होती. डबा रुळावरून हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आहे.
वाहतूक पूर्णतः पूर्वपदावर आल्याची माहिती रेल्वे व्यवस्थापनानं दिली आहे. मात्र तरीही वाहतूक काहीशी धीम्या गतीनेच सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.
श्चिम रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी क्रेनच्या सहाय्याने डब्बा हटवला. मात्र वाहतूक काहीशी उशिरानं सुरू होती.
लोअर परळ स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ जवळ एक्स्प्रेसचा पहिलाच डबा रुळावरुन घसरला होता. त्यामुळे लोअर परळच्या फलाट क्रमांक १ आणि २ फलाटांवरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती.