मुंबई : डोंबिवली येथून आज सकाळी सुटणारी ६ वाजून १७ मिनिटांच्या फास्ट लोकलमध्ये महिला फर्स्ट क्लासमध्ये चढणाऱ्या एका तरुणाला एका महिलेने धाडस करुन पकडले. तो गर्दुला तरुण सोनसाखळी चोर होता अणि मुंब्यातील एका मोठ्या सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीचा तो सदस्य असल्याचे तपासात पुढे आलंय.
या तरुणाच्या अटकेमुळे आता सोनसाखळी चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय. महिला डब्यात चढलेल्या तरुणाला ज्या महिलेने पकडले ती महिला अनुराधा पागोटे असून अनुराधा या कुर्ला आरपीएफच्या महिला पोलीस कर्मचारी आहेत.
तो तरुण सोनसाखळी चोरण्याच्या तयारीत होता असं पोलिसांनी सांगितले. त्याच उद्देशानं त्याने महिलांशी झटापट करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्याच डब्यात महिला पोलीस कर्मचारी अनुराधा पागोटे या ही प्रवास करत होत्या. अनुराधा यांनी त्याला हिसका दाखवला आणि त्याला पकडले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.