www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक हेमंत गोडसे यांच्या संभाव्य शिवसेना प्रवेशाच्या चर्चांनी नाशिकचं राजकारण ढवळून निघालं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी गोडसे इच्छुक आहेत. मनसेकडून त्यांना उमेदवारी मिळणार नसल्याची धरणा असल्याने त्यांनी शिवसेनचा रस्ता पकडण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.
पक्षातून ‘साईड ट्रॅकला’ टाकलं जात असल्याची भावना गोडसे यांनी काही माध्यम प्रतिनिधीसमोर बोलून दाखविली. मात्र यासंदर्भात शिवेसना आणि मनसेचे स्थानिक पदाधीकारी अद्याप कुठलीच माहिती नसल्याच संगतायेत. मनसेन गोडसे यांना मागील पंचवार्षिक मध्ये खासदारकीची उमेदवारी, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक ही पद दिल्याचा मनसेचा दावा आहे.
शिवसेनेत प्रवेश देण्याबाबत मुंबईतील एक नेता आग्रही असल्यची सूत्रांची माहिती आहे. मात्र स्थानिक पदाधिकारी याबाबत काही बोलायला तयार नाहीत. दरम्यान शिवसेनेन जरी आगामी लोकसभा निवडणुकांसाठी गोडसे यांना तिकीट देण्याची तयारी दाखविली तरी शिवसेनेत असंतोष उफाळण्याची दाट शक्यता आहे. निष्ठावंतांना डावलून नव्या लोकांना संधी देवू नये असा राग काही पदाधिकारी आताच आवळू लागल्याने हा संभाव्य प्रवेश सोहळा कधी पार पडतो याकडे सर्वंच लक्ष लागलय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.