www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुण्यातल्या अत्यंत गजबजलेल्या जंगली महाराज रस्त्यावरच्या मॉडर्न कॅफेला सकाळी दहाच्या सुमारास हॉटेलमधल्या भटार खाण्यात आग लागली होती. आगीत हॉटेलचं नुकसान झालंय मात्र, कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
मॉडर्न कॅफेच्या भटार खाण्यातल्या लाकडामुळे आगीनं उग्र रूप धारण केलं होतं. त्यानंतर अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली. भटार खाण्यातले सिलेंडर अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
दरम्यान, मुंबईतील मुलुंडमध्ये गोकुळ नावाच्या खासगी रुग्णालयाला आग लागली होती. या आगीत एका डॉक्टरचा होरपळून मृत्यू झालाय... राहुल रुद्रवार असं मृत डॉक्टरचं नाव आहे. पहाटे चारच्या दरम्यान ही घटना घडलीये. हॉस्पीटलमधील औषधांच्या दुकानाला प्रथम आग लागल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड होतीये.
या आगीत हॉस्पीटलची ओपीडी आणि औषधांचं दुकान जळून खाक झालंय. घटना घडली त्यावेळी हॉस्पीटलमध्ये १४ रुग्ण होते मात्र सर्व रुग्णांना तातडीनं सुरक्षीत स्थळी हलवण्यात आल्यानं मोठा अनर्थ टळला. शॉक सर्कीटमुळे ही आग लागल्याचा संशय वर्तवण्यात येतोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.