लंडन : लॉर्ड्स टेस्टमध्ये भारतीय संघ विजयापासून केवळ सहा पाऊले दूर असताना भारतीय संघाशी दोन-दोन हात करण्याची रणनीती आखण्यापेक्षा इंग्लिश गोलंदाजांची भूताची भीती वाटत आहे. तुम्ही विचार करत असाल भूताची भीती केवळ भारतीयांना वाटते तर तुम्ही चुकीचा विचार करीत आहात. इंग्लिश प्लेअर्सला भूतांनी सतावलं आहे.
सध्या इंग्लिश संघ एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये वास्तव्याला आहेत. या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये भूत असल्याचे शंकेने इंग्लिश प्लेअरची रात्रीची झोप उडाली आहे. असे मानले जाते की या हॉटेलमध्ये भूत आहेत आणि या ठिकाणी राहणाऱ्या गेस्टला सतावतात. लंडनमध्ये सामन्याच्यावेळी नेहमी याच हॉटेलमध्ये वास्तव्यास ठेवतात. आता या हॉटेलमध्ये भूत असल्याचे सांगून इंग्लडच्या प्लेअर्सने आपआपल्या खोल्या बदलण्याची मागणी केली आहे.
एका ब्रिटीश वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, इंग्लडच्या प्लेअर्ससह त्यांच्या पत्नी आणि गर्लफ्रेंडने लँघम या प्रसिद्ध हॉटेलमध्ये थांबण्यास नकार दिला आहे. इंग्लडचा जलदगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने भूत दिसल्याचे सांगितल्याचेही वृत्तपत्राने दावा केला आहे. श्रीलंकेदरम्यान झालेल्या टेस्ट वेळी ब्रॉडने आपली खोली बदली होती. ब्रॉडनुसार त्याच्या खोलीतील बाथरुमचा नळ आपोआप उघडून जायचा. तसेच खोलीतील वीज आपोआप बंद व्हायची. अशा प्रकारचे अनुभव बेन स्ट्रोक यानेही मीडियाशी शेअर केले आहेत.
एकीकडे भारतीय प्लेअर्सने मैदानात इंग्लिश प्लेअर्सवर दबाव बनवत आहेत तर दुसरीकडे मैदानाच्या बाहेर हॉटेलमध्ये ब्रिटीश खेळाडूंना भूतांनी सतावलं आहे. लँघम हॉटेलबद्दल असे बोलले जाते की, या हॉटेलमध्ये सात भूत राहतात. या हॉटेलमध्ये राहणाऱ्यांनी कोणाचा तरी खून केला आहे किंवा आत्महत्या केली आहे.
ब्रॉडनुसार श्रीलंकेविरूद्धच्या टेस्टवेळी मी ज्या हॉटेलच्या खोलीत होतो, त्या खोलीतील लाइट मी बंद करायचो तेव्हा आपोआप बाथरूमचा नळ सुरू व्हायचा आणि लाइट सुरू केल्यावर नळ बंद व्हायचा.
लंडनचे सर्वात शानदार हॉटेल असून प्रिन्स ऑफ वेल्सने याचे १८६५ मध्ये उद्घाटन केले होते. हॉटेलच्या कॉरिडोअर आणि बेडरूममध्ये भूत असल्याची अफवा आहे. हॉटेलमध्ये जर्मन डॉक्टरचे भूत आहे. जर्मन डॉक्टरने हनीमूनवेळी आपल्या पार्टनरचा खून केला होता. त्यानंतर आत्महत्या केली होती. तसेच एका सैनिकाने बाल्कनीतून उडी घेऊन आत्महत्या केली होती. या हॉटेलची सर्वात हॉन्टेड म्हणजे भूतांचा वावर असलेली खोली म्हणजे खोली नंबर ३३३ आहे. ही माहिती हॉटेलच्या वेबसाइटवर दिली आहे. १९७३ मध्ये बीबीसीचे एक रिपोर्टर जेम्स अलक्झांर गॉर्डन या खोलीत थांबले होते. त्यावेळी ते रात्री उठले असता एक प्लोरोसन कलरमध्ये हवेत तरंगणारा माणूस त्यांच्या दिशेने येत होता. अशा प्रकारच्या काहण्या या हॉटेलबद्दल सांगितल्या जातात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.