विशाखापट्टणम : न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय मॅचमध्ये भारतीय खेळाडूंच्या जर्सीवर त्यांच्या आईची नावं दिसली. प्रत्येक खेळाडूल घडवण्यामध्ये त्याच्या आईचा वाटा आहे हे दाखवण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली होती. या मॅचमध्ये जयंत यादवनं भारतीय टीममध्ये पदार्पण केलं.
या मॅचसाठी जयंत यादवला लक्ष्मी आणि ज्योती ही दोन नावं हवी होती, पण त्याला लक्ष्मी हेच नाव जर्सीवर मिळालं. लक्ष्मी यांनी जयंतला जन्म दिला, पण सतरा वर्षांपूर्वी एका विमान अपघातामध्ये लक्ष्मी यांचा मृत्यू झाला. लक्ष्मी यांच्या मृत्यूनंतर जयंतचा सांभाळ ज्योती यांनी केला आणि प्रत्येक कठीण प्रसंगी त्या जयंतच्या मागे उभ्या राहिल्या. यासाठी जयंतला त्याच्या जर्सीवर लक्ष्मीबरोबरच ज्योती हे नावही हवं होतं.
जयंत यादव याचा जन्म दिल्लीमध्ये झाला आहे. ऑफ स्पिनर आणि उपयुक्त बॅट्समन असलेला जयंत हरियाणाकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो. आपली पहिलीच आंतरराष्ट्रीय मॅच खेळताना जयंतनं कोरे अंडरसनची विकेट घेतली.
पाहा काय म्हणाला जयंत यादव
Debutant Jayant Yadav's #Sandesh2Mother pic.twitter.com/IXp5v6hZG5
— BCCI (@BCCI) October 29, 2016