हैदराबाद : टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत फिटनेसवर बोलताना सानियाने म्हटलं आहे, "सडपातळ, स्लिम दिसलात म्हणून तुम्ही सेक्सी ठरत नाहीत. तुम्ही तंदुरुस्त, मजबूत असाल तर तुम्ही सेक्सी आहात."
मी चांगले टेनिस खेळले नाही तर, कोणाला माझा फोटो काढायला आवडणार नाही. शारीरीकदृष्टया मजबूती म्हणजे सेक्सी असण आहे. माझ्या दुष्टीने स्लिमनेस म्हणजे सेक्सी नाही, असे सानियाने सांगितले.
माझ्यासाठी माझ्या शरीराचा फिटनेस महत्वाचा आहे. मी माझ्या शरीराला विशेष आकार देण्यावर मेहनत घेत नाही. टेनिसला माझे पहिले प्राधान्य आहे. टेनिस खेळण्यासाठी विशिष्ट स्तराचा फिटनेस आणि शक्ती लागते. त्यासाठी जेवढी गरज असेल तेवढी मी माझ्या फिटनेसवर मेहनत घेईन, असंही सानियाने म्हटले आहे.