www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
यंदा 11 मध्ये प्रवेश घेणा-यांसाठी एक खुशखबर आहे. 11वीमध्ये प्रवेशाच्या जागांमध्ये वाढ झालीय. सरकारने यावर्षी मुंबई 28 नविन महाविद्यालये सुरु केल्यामुळे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतल्या प्रवेश जागांमध्ये वाढ झालीय.
यंदा मुंबईतल्या 709 महाविद्यालयांसाठी प्रवेश होणार आहेत. गेल्यावर्षी 1 लाख 49 हजार 415 जागांसाठी प्रवेश झाले होते मात्र, यावर्षी ही संख्या 1 लाख 54 हजार 846 च्या घरात आहे. यामुळे सर्वाधिक स्पर्धा असणा-या सायन्ससाठी 3327 जागा वाढणार आहेत. कॉमर्ससाठी 1562 तर आर्ट्ससाठी 542 प्रवेश जागांमध्ये वाढ झाली आहे.
दरम्यान, यंदा नवीन अभ्यासक्रमानुसार आलेल्या 10 वीच्या पुस्तकांच्या किमतींमध्ये तब्बल तीन पटींनी वाढ झालीय. प्रिटिंग, रंग आणि इतर सगळाच खर्च वाढल्यामुळे या पुस्तकांच्या किमती थेट तीन पटींनी वाढवण्यात आल्याचं समजतंय. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून 15-20 रुपयांच्या घरात असलेल्या पुस्तकांच्या किंमती 80-90 रुपयांच्या घरात गेल्यानं सर्वसामान्य पालकांना शिक्षणातही तडजोड करावी लागतेय
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.