www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भारतातील महत्त्वाच्या शहरांत आयटी क्षेत्र आता चांगलंच विस्तारलंय. पण, याचसोबत हा विस्तार एक चिंता बनून समोर उभा राहिलाय. ही चिंता आहे ‘हॅकिंग’ची... हॅकिंगवर लक्ष ठेवणं आणि आपली माहिती सुरक्षित ठेवणं हा मोठा प्रश्न सगळ्यांसमोर आहे. या हॅकिंगचा फटका तुम्हालाही बसण्याची शक्यता आहे कारण, हॅकिंगवर उपाय म्हणून सध्या वापरात असलेलं विंडोज-एक्सपी या सॉफ्टवेअरची विक्री बंद होणार आहे.
तुम्ही जर विंडेज एक्स-पी वापरत असाल तर तुम्हाला तुमच्या पीसीमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये इतर नवीन सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावं लागेल. पुढच्या वर्षी ८ एप्रिल २०१४ पासून विंडोज-एक्सपीची सपोर्ट सर्व्हिस बंद होईल, असं मायक्रोसॉफ्टनं जाहीर केलंय. यामुळे या व्हर्जनमधून भविष्यात सिक्युरिटी अपडेटस् मिळणं बंद होईल. त्याचबरोबर सुरक्षेसंबंधी मिळणार्यां इतर मोफत सेवाही बंद होणार आहेत. त्यामुळे तुमच्या पीसीला हानी पोहचण्याचा धोका अधिक राहील. हॅकर्स सहजासहजी तुमच्या कम्प्युटरचा आणि त्यातील माहितीचा ताबा मिळवू शकतील. याआधीही मायक्रोसॉफ्टने ऑगस्ट २००१ मध्ये अशा प्रकारचे संकेत दिले होते. विंडोज-एक्सपी सर्व्हिस पॅक - ३ असे त्याला म्हटले जाते. नोव्हेंबर २००६ मध्ये त्याला विंडोज व्हिस्टा, विंडोज ७ (जून २००९) आणि विंडोज ८ (ऑगस्ट २०१२) यांची निर्मिती मायक्रोसॉफ्टने केली आहे.
भारतात माहिती तंत्रज्ञान उद्योगाची उलाढाल सुमारे १०८ अब्ज डॉलर्स एवढी आहे. त्यामुळे जगभरातील आऊटसोर्सिंगचे हे केंद्र आहे. म्हणूनच सायबर चोरांसाठी देखील हे आवडीचे ठिकाण असल्याचे स्पष्ट झाले आहे. भूमीगत संकेतस्थळांच्या मदतीने बँकिंगसह इतर संस्थांचा तपशील चोरण्यात हॅकर्स यशस्वी होत आहेत. जागतिक आर्थिक क्षेत्रासाठी आपली सेवा देणाऱ्या कंपन्या भारतात आहेते, अशी माहिती पुणे येथील इंडिया फॉरेन्सिक संस्थेने अहवालात दिली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.