अन्न, वस्त्र, निवारा या एकेकाळच्या मुलभूत गरजा होत्या. आज त्यांचीच जागा मोबाईल, फेसबुक आणि व्हॉटसअपनं घेतलीय.
येता जाता फेसबुकवर कमेंट टाकणं, व्हॉटसअपवर फोटो लोड करणं हे सर्रास सुरू असतं.. पण आता फेसबुकवर एखाद्याबद्दल अश्लील कमेंट टाकलीत, तर थेट तुम्हाला जेलची हवा खावी लागणार आहे. तेव्हा कमेंट टाकताना जरा जपून.
आजच्या तरुण पिढीला एकवेळ जेवायला वेळ मिळणार नाही, पण फेसबुक आणि व्हॉ़टसअपवर कमेंटस करायला नक्कीच वेळ आहे.
मात्र फेसबुकवर अशीच कमेंट करणं मीरारोडला राहणा-या सुमेध पाडवेला महाग पडलंय. त्यानं एका मुलीच्या वॉलवर अश्लील कमेंट केली. त्यामुळे त्याला जेलची हवा खावी लागलीय.
सुमेध हा असिस्टंट डायरेक्टर आहे. त्यानं अनेक सिनेमे आणि सीरिअल्स डायरेक्ट केल्या आहेत.
ज्या मुलीच्या फ़ेसबुक वॉलवर सुमेधनं अश्लील कमेंट केलीय, ती मुलगी सुमेधची नातेवाईकच आहे.
तिनं सुमेधला लग्नासाठी नकार दिला म्हणून सुमेधने तिच्यावरचा राग तिच्या फ़ेसबुक वॉलवर कमेंट करुन काढला.
आता सगळ्या सोशल नेटवर्किंग साईटसवर पोलिसांनी नज़र ठेऊन तसे कायदेही बनवायला सुरुवात केलीये.
त्यामुळे यापुढे कुणाच्याही भावना दुखावणारी कमेंट टाकण्याआधी शंभर वेळा विचार करा.... किंवा अशा दुखावणा-या कमेंटस टाकूच नका.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.