www.24taas.com, झी मीडिया, कर्जत
कर्जत नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मनसेनं अनोखी शक्कल लढवलीय... टपालाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोचण्याच्या कालबाह्य पद्धतीला पक्षानं पुनरुज्जीवन दिलंय... त्यासाठी मनसेनं चक्क राज ठाकरेंची टपाल तिकीटं छापून घेतलीहेत...
काळ बदललाय... जमाना व्हॉट्स अॅप, फेसबुक, ट्विटरचा आहे... हल्लीच्या तरूणाईवर या अत्याधुनिक सेवांचं गारुड आहे, मात्र मनसेचं जुन्या साधनांचं आकर्षण संपलेलं नाही... कर्जत नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं ही बाब अनुभवायला मिळतेय... मतदारांपर्यंत पोचण्यासाठी मनसेनं यावेळी चक्क टपाल यंत्रणेचा वापर करण्याची अनोखी शक्कल लढवलीय... पक्षानं पोस्टाच्या माय स्टॅम्प योजनेचा फायदा उचललाय.. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची टपाल तिकीटं छापून घेण्यात आलीहेत... मनसेला मतदान का कराल याबाबत राज ठाकरेंचं छापील आवाहन टपाल तिकिटाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोचवलं जातंय... १२ जानेवारीला होणाऱ्या या निवडणुकीत १८ पैकी १७ वॉर्डांमध्ये मनसेनं उमेदवार उभे केलेत...
आम आदमी पार्टीनं राजकारणाचं स्वरुपच बदलून टाकलंय... सर्वसामान्यांमध्ये सध्या सर्वाधिक कुतूहलाचा विषय असलेल्या या पक्षाची भिस्त अत्याधुनिक संपर्क साधनांवर आहे. आम आदमी पार्टीमुळे अन्य राजकीय पक्षही मतदारांपर्यंत प्रभावी जनसंपर्का साधण्यासाठी जागरुक झाले ही मोठी जमेची बाजू आहे...
प्रचारासाठी टपाल तिकीटाची संकल्पना पाहून दस्तुरखुद्द राज ठाकरेंनीही आश्चर्य व्यक्त केलं... आता टपाल तिकिटावरची ही राजमुद्रा मतदारांनी स्वीकारली का, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल...
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ