अमूलच्या नावाने कुणी घेतली आमिरची फिरकी?

अभिनेता आमिर खानची अमूलच्या नावावर कुणी भलत्यानेच फिरकी घेतली आहे. मात्र सोशल मीडियावर खालील विडंबन करणार, हुबेहुब अमूल स्टाईलचं कार्टुन लोकप्रिय होत आहे. हे चित्र अमूलकडून काढण्यात आलेलं नाही, कारण अमूलच्या ऑफिशियल फेसबुक पेजवर हे चित्र नाहीय.

Updated: Nov 25, 2015, 05:46 PM IST
अमूलच्या नावाने कुणी घेतली आमिरची फिरकी? title=

मुंबई : अभिनेता आमिर खानची अमूलच्या नावावर कुणी भलत्यानेच फिरकी घेतली आहे. मात्र सोशल मीडियावर खालील विडंबन करणार, हुबेहुब अमूल स्टाईलचं कार्टुन लोकप्रिय होत आहे. हे चित्र अमूलकडून काढण्यात आलेलं नाही, कारण अमूलच्या ऑफिशियल फेसबुक पेजवर हे चित्र नाहीय.

आमिर खान देश सोडण्याची भाषा करतोय, अशा बातम्या टीव्ही मीडियावर आल्यानंतर, सोशल मीडियावर आमिर खानवर जोरदार टीका होत आहे. अमूलच्या नावावर कुणीतरी मात्र आमिरला या कार्टुनच्या माध्यमातून फोडून काढलं आहे. 

अमूल स्टाईलमध्ये आमिरला फटकारतांना म्हटलंय, खा पिके जाना. या तीन शब्दांमध्ये खाऊन पिऊन जाण्याचा सल्ला (जर देश सोडायचाच असेल तर) पीकेला दिला आहे. पीके हे आमिर खानचं पात्र चांगलंच गाजलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.