Samudrik Shahshtra Nails : जर आपल्या शरीरात रक्ताची कमी आहे का? हे जाणून घ्यायचे असेल तर आपण लगेचच आपल्या नखांकडे पाहतो. कारण आपल्याला लहाणपणापासून डॉक्टरांकडे गेलो की सगळ्यात आधी नखं दाखवण्याची सवय असते. बरेच आजार हे आपल्या हाताची नखं पाहिली की कळतात. पण सामुद्रिक शास्त्रानुसार, नखं आपल्या भविष्याविषयी देखील अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगू शकतात. जर आपल्याला एखाद्या व्यक्तीचे भविष्य जाणून घ्यायचे असेल तर आपण त्याची नखं पाहूनही जाणून घेऊ शकतो. नखांवर असलेल्या काही खुणांवरून किंवा मग नखांवर असलेल्या डागांवरून त्या व्यक्तीला भविष्यात होणारे लाभ किंवा नुकसान कळू शकते. चला तर सामुद्रिक शास्त्रामध्ये नखांविषयी कोणत्या गोष्टी आपण जाणून घेऊ शकतो? चला जाणून घेऊया... (Nails)
नखावर असलेलं अर्धचंद्र (Half Moon On Nails)
कोणत्या व्यक्तीच्या नखावर जर अर्धचंद्र असेल तर त्यावरून हे कळते की हे लोक कोणासाठी नेहमीच उभे राहतात, कोणासाठी कधी तरी, तर कोणासाठी कधीच उभे राहत नाहीत. अर्धचंद्राचं हे निशान कधीच एक सारखं राहत नाही ते नेहमीच बदलत राहतं. जर नखावर पांढऱ्या रंगाचं अर्धचंद्र दिसत असेल तर ते शुभ मानले जाते. त्यामुळे त्या व्यक्तीला यश मिळते.
लांब नखं (Long Nails)
सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांची लांब नखं असतात, ते लोक नियमांचे पालन करतात. त्या लोकांच्या आयुष्यात नेहमीच चांगल्या गोष्टी आणि आनंद असेल याचे संकेत देतात. ज्या लोकांच्या करंगळीच्या नखावर पांढऱ्या रंगाचे निशान असते त्यांना बिझनेसमध्ये यश मिळते.
हेही वाचा : मला हिंदी समजत नाही, चल जा; भाषेवरुन सुरु झालेल्या वादावर Prakash Raj यांचं मोठं वक्तव्य
काळे डाग (Black Spot On Nail)
सामुद्रिक शास्त्रानुसार, नखांवर जर काळे डाग असतील तर ती व्यक्ती अपयशी होऊ शकते. कारण काळे डाग हे अपयश दर्शवतं. या लोकांना आरोग्या संबंधीत अनेक समस्या देखील होऊ शकतात. त्यामुळे या लोकांनी आरोग्याची काळजी घेण्यास सांगितले आहे.
नखावर खड्डे असणे (Dumps On Nails)
सामुद्रिक शास्त्रानुसार, ज्या लोकांच्या नखांवर खड्डे असतात. त्या लोकांनी नेहमीच काळजी घेतली पाहिजे. कारण नखांवर खड्डे येण्याचे कारण म्हणजे त्यांच्या आयुष्यात अनेक समस्या येऊ शकतात. त्यामुळेच नेहमी शांत राहण्याचा प्रयत्न करा.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)