कोलंबो : निदहास ट्रॉफी स्पर्धेत भारताने बांगलादेशवर ४ विकेट राखून विजय मिळवत जेतेपद उंचावले.
या सामन्यातील विजयाचा सूत्रधार ठरला तो दिनेश कार्तिक. त्याच्या दमदार २९ धावांच्या खेळीने भारताला विजय मिळवून दिला.
दिनेश कार्तिने ८ चेंडूत २९ धावांची तुफान खेळी केली. खरंतर संपूर्ण संघाने स्पर्धेत चांगली कामगिरी केली मात्र सामन्याचा खरा हिरो ठरला दिनेश कार्तिक.
कार्तिकच्या तुफान खेळीमध्ये २ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. ज्यावेळी कार्तिक फलंदाजीसाठी आला तेव्हा भारताची स्थिती काही चांगली नव्हती. मात्र कार्तिकने संयमी फलंदाजी करताना विजयश्री खेचून आणली. त्याच्या त्या विनिंग सिक्सची अद्यापही चर्चा सुरु आहे.
विनिंग सिक्स मारल्यानंतर मैदानात जल्लोष सुरु होता. मात्र दिनेश शांत होता. याबाबत त्याला विचारले असता दिनेश म्हणाला, मी नेहमीच पाहिलंय की जेव्हा जल्लोष करण्याची वेळ येते तेव्हा लोकांना जे हवंय ते मी नाही करत. मला लाजतो. ओरडून अथवा राग व्यक्त करुन मला माझा आनंद व्यक्त करता येत नाही. मला अनेकदा याबाबतचा प्रश्न मला विचारला जातो. तु जल्लोष का नाही केला. नागिण डान्स का नाही केला? मला जे करता येते तेच मी करु शकतो. मी फक्त तो क्षण एन्जॉय केला.