IND vs WI T20: 'या' खेळाडूनं रोखला टीम इंडियाचा वि़जयरथ, वेस्ट इंडिजचा 5 विकेटनं विजय

दुसऱ्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजने टीम इंडियाचा 5 विकेट्सने पराभव केला. 

Updated: Aug 2, 2022, 08:23 AM IST
IND vs WI T20: 'या' खेळाडूनं रोखला टीम इंडियाचा वि़जयरथ, वेस्ट इंडिजचा 5 विकेटनं विजय title=

मुंबई : दुसऱ्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजने टीम इंडियाचा 5 विकेट्सने पराभव केला. या विजयानंतर आता पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत दोन्ही संघ 1-1ने बरोबरीत आहेत. या सामन्यात टीम इंडियाच्या विजयाच्या आशा होत्या, मात्र रोहित शर्माचा अंतिम क्षणी घेतलेल्या निर्णय पराभवाचा कारण ठरला.  

दुसऱ्या T20 सामन्यात 139 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाने 19 षटकात 5 गडी गमावून 129 धावा केल्या होत्या. शेवटच्या ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजला विजयासाठी 10 धावांची गरज होती. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्माने शेवटची ओव्हर वेगवान गोलंदाज आवेश खानला दिली होती. 

एकेकाळी भारतीय संघ हा सामना जिंकण्याच्या जवळ होता, पण शेवटी वेगवान गोलंदाज आवेश खानच्या एका चुकीने सामना गमावला. आवेशने पहिलाच बॉल नो-बॉल टाकला आणि यावर एक धावही काढली गेली. यानंतर स्ट्राईकवर आलेल्या डेव्हॉन थॉमसने पुढच्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार मारून सामना जिंकला. त्यामुळे रोहित शर्माने शेवटच्या ओव्हर्समध्ये घेतलेला निर्णय चुकीचा ठरला. 

टीम इंडियाची फलंदाजी गडगडली
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 19.4 षटकांत सर्वबाद 138 धावांवर आटोपला. हार्दिक पांड्याने सर्वाधिक 31 आणि रवींद्र जडेजाने 27 धावा केल्या. तर वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज ओबेद मॅकॉयने 4 षटकात 17 धावा देत 6 बळी घेतले. प्रत्युत्तरात विंडीज संघाने 5 विकेट्सवर 145 धावा करत सामना जिंकला. सलामीवीर ब्रेंडन किंगने सर्वाधिक 68 धावांची खेळी केली. 

दरम्यान वेस्ट इंडिजच्या विजयानंतर पाच सामन्यांच्या T20 मालिकेत दोन्ही संघाची 1-1 अशी बरोबरी झाली आहे.