IND vs AUS 1st ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये नुकतीच बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar trophy) खेळवण्यात आली होती. या सिरीजमध्ये टीम इंडियाने (Team India) बाजी मारून 2-1 अशा फरकाने सिरीज जिंकली. त्यानंतर आता टीम इंडियाला वनडे सिरीज (IND vs AUS ODI series) खेळायची आहे. शुक्रवारपासून या सिरीजला सुरुवात होणार असून पहिला सामना वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. केवळ पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची धुरा हार्दिक पंड्याकडे (Hardik Pandya) देण्यात आली आहे.
पहिल्या वनडे सामन्यात रोहित शर्मा अनुपस्थितीत राहणार आहे. त्यामुळे कर्णधारपदाची धुरा हार्दिक पंड्याकडे (Hardik Pandya) देण्यात आली आहे. रोहित शर्मा त्याच्या वैयक्तिक कारणांमुळे बाहेर पडल्याची माहिती आहे. रोहित शर्माची पत्नी रितीका सजदेह हिच्या भावाचं शुक्रलारी लग्न आहे. याच कारणाने पहिल्या वनडे सामन्यातून रोहितने (Rohit Sharma) माघार घेतली आहे.
दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिंस त्याच्या आईच्या निधनामुळे सिरीजसाठी अनुपस्थितीत राहणार आहे. यामुळे कर्णधारपदाची धुरा पुन्हा एकदा स्टिव्ह स्मिथकडे आहे. स्मिथच्या नेतृत्वाखाली कांगारूंनी तिसऱ्या टेस्ट सामन्यामध्ये विजय मिळवला होता.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 17 मार्च रोजी पहिला वनडे सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना तुम्ही घर बसल्या स्टार स्पोर्टस नेटवर्कवर पाहू शकता. याशिवाय मोबाईल किंवा इतर डिव्हाईसवर डिज्नी प्लस हॉट स्टार एप (Disney + Hot Star) यावर लाईव्ह स्ट्रीमिंग दिसणार आहे. जर तुम्हाला हा सामना मोफत पहायचा असेल तर डीडी स्पोर्ट्सवर पाहता येणार आहे.
भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता टॉस होणार आहे. तर दुपारी 1.30 वाजता सामना सुरु होणार आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, के एल राहुल, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वाशिंगटन सुंदर, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, जयदेव उनादकट