केपटाऊन : पहिल्या टेस्ट मॅचचा दुसरा दिवस टीम इंडियासाठी खूपच कठीण ठरला. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय टीमला चांगला स्कोअर करण्यात अपयश आलं. त्यामुळे आफ्रिकन टीमने भारताविरोधात आघाडी घेतली.
दुसऱ्या दिवशी टीम इंडियाकडून हार्दिक पांड्या आणि चेतेश्वर पुजारा यांनी चांगली पार्टनरशीप केली. यामुळे टीम इंडिया काही प्रमाणात सावरली.
ऑफ स्टंम्पच्या बाहेर जाणारे बॉल पुजारा सोडत होता. मात्र, एका बॉलला चुकून बॅट लागली आणि तो कॅच आऊट झाला.
आऊट झाल्यानंतर पुजाराने म्हटलं की, प्रामाणिकपणे सांगतो की मला तो बॉल सोडायला हवा होता मात्र माझ्याकडून चूक झाली आणि त्याची किंमत मला मोजावी लागली.
दक्षिण आफ्रिकन टीमच्या बॉलर्सच्या आक्रमणासंदर्भात पुजाराने म्हटलं की, त्यांचं आक्रमण जगभरातील श्रेष्ठ आक्रमण आहे. मला असं वाटतं की अशाप्रकारचं आक्रमण जगभरातील इतर कुठल्याही टीमच्या बॉलर्सचं नाहीये. दक्षिण आफ्रिकेचे सर्व बॉलर्स आपल्या पिचवर चांगलं प्रदर्शन करतात.
पुजाराने पुढे म्हटलं की, ज्यावेळी मी बॅटिंग करतो त्यावेळी बॉलर्स आणि त्यांच्या लाईनअपला पाहत नाही. मी बॉल पाहून खेळतो. एक बॅट्समन म्हणून मी केवळ बॅटिंगकडे लक्ष देतो असं पाहत नाही की आपण कुठल्या बॉलरसमोर बॅटिंग करत आहोत.