इरफान पठाणकडून जामियाच्या विद्यार्थ्यांचं समर्थन

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन देशभरामध्ये आंदोलनं सुरु आहेत.

Updated: Dec 16, 2019, 08:18 PM IST
इरफान पठाणकडून जामियाच्या विद्यार्थ्यांचं समर्थन title=

नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन देशभरामध्ये आंदोलनं सुरु आहेत. यातल्या अनेक आंदोलनांना हिंसक वळण लागलं आहे. आंदोलन करणाऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला आहे. दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात काढलेल्या मोर्चात हिंसाचार करत दिल्लीतील बस, खासगी वाहनं, दुचाकींची जाळपोळ करण्यात आली.

आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या चार गाड्यांवरही हल्ला करण्यात आला. या आंदोलनादरम्यान विद्यार्थी, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांसह १०० हून अधिक जण जखमी झाले. अग्निशमन दलातील जवानांवर हल्ला करण्यात आल्यानंतर पोलिसांनी महाविद्यालयाच्या आवारात अश्रूधुराच्या निळकांड्या फोडल्या. त्यानंतर विद्यापीठात घुसलेल्या आंदोलकांना बाहेर काढण्यात आले.

पोलिसांविरोधात झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. मथुरा रोड, न्यू फ्रेंड्स कॉलनी, जामिया नगर आणि सराई जुलेना येथे जवळपास १००० निदर्शकांनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात सहा बस आणि ५० हून अधिक वाहनांची जाळपोळ करण्यात आली.

virat

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात आंदोलन करणाऱ्या ५० विद्यार्थ्यांना सोमवारी पहाटे सोडण्यात आलं. भारताचा क्रिकेटपटू इरफान पठाण याने या आंदोलनात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सुरुच राहील. पण मी आणि माझा देश जामियाच्या विद्यार्थ्यांसाठी चिंतित आहोत, असं ट्विट इरफान पठाणने केलं आहे.