कोलकाता : ऑस्ट्रेलियाविरुद्धची पहिली वनडे भारतानं २६ रन्सनं जिंकली आहे. यानंतर आता २१ सप्टेंबरला कोलकात्याच्या ईडन गार्डनवर दुसरी वनडे मॅच होणार आहे. पण या मॅचवर पावसाचं संकट आहे. दक्षिण बंगालमध्ये आलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २१ सप्टेंबरला कोलकात्यामध्ये पावसाचा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे.
चेन्नईमध्ये झालेल्या पहिल्या वनडेमध्येही पावसाचा खेळ पाहायला मिळाला. ५० ओव्हरमध्ये भारतानं २८१ रन्स केल्यानंतर चेन्नईमध्ये पावसाला सुरुवात झाली. यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १६४ रन्सचं आव्हान मिळालं.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्याच नाही तर २४ सप्टेंबरला होणाऱ्या तिसऱ्या वनडेमध्येही पावसाचं संकट असणार आहे. तिसरी वनडे इंदोरमध्ये खेळवण्यात येणार आहे. पण २२ ते २४ सप्टेंबरदरम्यान इंदोरमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.