...म्हणून धोनीने १५ ऑगस्टला ७.२९ वाजता निवृत्ती घेतली

भारताचा सगळ्यात यशस्वी कर्णधार असलेल्या एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं आहे.

Updated: Aug 17, 2020, 01:04 PM IST
...म्हणून धोनीने १५ ऑगस्टला ७.२९ वाजता निवृत्ती घेतली title=

मुंबई : भारताचा सगळ्यात यशस्वी कर्णधार असलेल्या एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं आहे. १५ ऑगस्टला धोनीने इन्स्टाग्रामवर आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. निवृत्तीची घोषणा करताना धोनीने इन्स्टाग्रामवर त्याच्या कारकिर्दीतल्या क्षणांचा व्हिडिओ शेयर केला. या व्हिडिओसोबत धोनीने मे पल दो पल का शायर हूं हे गाण लावलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Thanks a lot for ur love and support throughout.from 1929 hrs consider me as Retired

A post shared by M S Dhoni (@mahi7781) on

७ वाजून २९ मिनिटांपासून मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्याचं समजावं, असं धोनी त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टवर म्हणाला. यानंतर धोनीने ७.२९ वाजता निवृत्ती का जाहीर केली, याबाबत चर्चा सुरू झाल्या. काहींनी तर वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्धचा पराभव ७ वाजून २९ मिनिटांनी झाला म्हणून धोनीने यावेळी निवृत्ती घेतल्याचं सांगितलं, तर काहींनी न्यूझीलंडविरुद्धच्या याच मॅचमध्ये धोनी ७.२९ मिनिटांनी आऊट झाल्याचा दाखला दिला. पण धोनीच्या निवृत्त्तीच्या वेळेबाबतचं तथ्य समोर आलं आहे. 

भारतामध्ये सगळ्यात शेवटचा सूर्यास्त हा गुजरातच्या गुहार मोती येथे होतो. १५ ऑगस्टच्या दिवशी गुहार मोतीमध्ये सूर्यास्ताची वेळ ७ वाजून २९ मिनिटं होती. याच कारणामुळे धोनीने स्वातंत्र्यदिनी देशातल्या सगळ्यात शेवटच्या सूर्यास्ताची वेळ निवडली. गुहार मोती हे भारताच्या पश्चिम सीमेचं सगळ्यात शेवटचं टोक आहे. 

सूर्यास्तासोबतच निघून जायचं धोनीने ठरवल्यामुळे त्याने ७.२९ या वेळेची निवड केली. धोनीने निवृत्तीची वेळ सांगताना 1929hrs असं लिहिलं. लष्कराच्या नोंदीही अशाच पद्धतीने लिहिल्या जातात, यामुळे धोनीचं लष्करावरचं प्रेमही दिसून येतं, असं धोनीच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलं. 

१ नोव्हेंबर २०११ साली लष्कराने धोनीला लेफ्टनंट कर्नलची पदवी दिली. २०१९ वर्ल्ड कप संपल्यानंतरही धोनी क्रिकेटमधून विश्रांती घेऊन लष्कराची सेवा करण्यासाठी गेला होता.