IND Vs WI: वनडे सिरीजपूर्वीच टीम इंडियाला अजून एक मोठा धक्का

टीम इंडियाचा फलंदाज शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, नवदीप सैनी यांच्यानंतर अजून एक स्टार खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

Updated: Feb 4, 2022, 03:36 PM IST
IND Vs WI: वनडे सिरीजपूर्वीच टीम इंडियाला अजून एक मोठा धक्का title=

मुंबई : 6 फेब्रुवारीपासून भारत विरूद्ध वेस्ट इंडिजच्या वनडे सिरीजला सुरुवात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सिरीजमधील पहिला सामना खेळवला जाणार आहे. मात्र सिरीजपूर्वीच टीम इंडियाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा फलंदाज शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, नवदीप सैनी यांच्यानंतर अजून एक स्टार खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. 

हा खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह

टीममध्ये रविंद्र जडेजाच्या जागी समावेश करण्यात आलेला अक्षर पटेल (Axar Patel) कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं समोर आलं आहे. अक्षर पटेल कोरोना पॉझिटीव्ह असलेला टीममधील पाचवा खेळाडू आहे. अक्षर पटेल टीम इंडियाच्या नंबर 1 ऑलराऊंडर मानला जातो. 

अक्षर पटेल डेथ ओव्हर्समध्ये अतिशय चांगली गोलंदाजी करतो. उत्तम बॉलिंगसोबतच तो धडाकेबाज फलंदाजीसाठी देखील ओळखला जातो. टीम इंडियासाठी अक्षर फलंदाजी, गोलंदाजी तसंच फिल्डींग या तिन्ही विभागात फिट होतो. या खेळाडूने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत चांगली कामगिरी केली होती. अशा परिस्थितीत तो कोरोना पॉझिटिव्ह आल्याने संघाला मोठा झटका बसलाय.

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा आणि आवेश खान

टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर, आवेश खान आणि हर्षल पटेल. 

विडिंज विरुद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेचं वेळापत्रक 

पहिली वनडे - 6 फेब्रुवारी 
दुसरी वनडे - 9 फेब्रुवारी
तिसरी वनडे -12 फेब्रुवारी

पहिली टी 20 - 15 फेब्रुवारी 
दुसरी टी 20 - 18 फेब्रुवारी
तिसरी टी 20 - 21 फेब्रुवारी