रोहित शर्मा, मोहम्मद शमी आणि श्रेयस अय्यर हे मागील अनेक वर्षांपासून एकत्र खेळतायत. तिघेही एकमेकांना फिल्डवर तसेच वैयक्तिक आयुष्यात खूप चांगलं ओळखतात. टीम इंडियाचे काही खेळाडू बुधवारी एका अवॉर्ड शोमध्ये संमेलित झाले होते. यात त्यांनी रोहित शर्माबाबत बोलताना सांगितले की, त्याला राग का येतो आणि तो कशा प्रकारे स्वतः राग व्यक्त करतो? सध्या शमी आणि अय्यरने रोहितबाबत केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये मोहम्मद शमीने सांगितले की, "सर्वात आधी रोहित शर्मा तुम्हाला स्वातंत्र देतात जेणेकरून तुम्ही तुमचा गेम खेळू शकता. ही त्यांच्यातील सर्वात चांगली गोष्ट आहे. जर तुम्ही त्याच्या अपेक्षेवर खरे उतरत नाही तेव्हा त्यांची थोडी थोडी प्रतिक्रिया दिसू लागते. ते तुम्हाला सांगितली एखादी गोष्ट करायला हवी होती किंवा ही गोष्ट साध्या व्हावी म्हणून अजून काय प्रयत्न करायला हवेत. त्यांनी सांगितलेली गोष्ट तुम्ही ऐकून तसे करावे ही अपेक्षा असते. परंतु जर त्यांनी सांगितलेली गोष्ट झाली नाही, तर तुम्हाला स्क्रीनवर दिसू लागते त्यांची रिऍक्शन कशी असते".
हेही वाचा : IPL 2025: पंजाब किंग्सचं स्वप्न भंगलं, दिग्गज खेळाडूला नाही बनवू शकले कोच, LSG साठी आनंदाची बातमी
या दरम्यान श्रेयस अय्यरने मोहम्मद शमी रोहित शर्माबाबत जे बोलतोय ते खरं आहे असे सांगतो. श्रेयस म्हणाला, 'तो काही बोलत नाही, फिल इन द ब्लॅंक सारखं वाटतं, परंतु तो कोणाला बोलतोय आणि कसं बोलतोय हे सगळं बघून लक्षात येतं. कारण आम्ही इतकी वर्ष एकत्र खेळतोय. आम्हाला ते कळून जातं'.
श्रेयस अय्यर आणि मोहम्मद शमीच्या वक्तव्यावर उत्तर देताना, रोहित शर्मा म्हणाला, 'मी त्यांना मैदानावर स्वतः ते जसे आहेत तसे असायला सांगतो. यासाठी सर्वप्रथम मला स्वतः मी जसा आहे तसे मैदानात उतरावे लागेल. मला एवढेच म्हणायचे आहे'. रोहितच्या या बोलण्यावर सर्वांनी टाळ्या वाजवल्या.