24taas

भारताकडून पहिल्यांदाच श्रीलंकेला ‘विराट’वॉश!

नियमित कणर्धार महेंद्रसिंग धोनीचे आपणच खरे वारसदार असल्याचं सिध्द करत विराट कोहलीनं आपल्या नेतृत्त्वाखाली श्रीलंका संघाला वनडे मालिकेत ‘विराट’ वॉश दिला. पाच सामन्यांची ही मालिका भारतानं ५-० अशी जिंकली. रविवारी झालेल्या पाचव्या वन-डे सामन्यात श्रीलंकेचा ३ गडी आणि ८ चेंडू राखून पराभव केला. 

Nov 17, 2014, 07:59 AM IST

शिवसेनाप्रमुखांचा दुसरा स्मृतिदिन, शिवसेनेचं शक्तिप्रदर्शन!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनाच्या निमित्त शिवाजी पार्कमधील त्यांच्या स्मृतिस्थळावर शिवसेनेनं शक्तिप्रदर्शन करायचं ठरवलं आहे. विधानसभा निवडणुकीत युतीत ताणल्या गेलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमिवर भाजप नेते स्मृतिस्थळावर बाळासाहेबांना आदरांजली अर्पण करायला येणार का? याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

Nov 16, 2014, 03:56 PM IST

स्कोअरकार्ड: भारत विरुद्ध श्रीलंका (पाचवी वनडे)

भारत विरुद्ध श्रीलंका अखेरची पाचवी वनडे मॅच रांचीत सुरू झालीय.श्रीलंकेनं टॉस जिंकूनश्रीलंकेचा प्रथम फंलदाजीचा निर्णय, केदार जाधवचे आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण, सुरेश रैनाच्या जागी जाधवचा भारतीय संघात समावेश. 

Nov 16, 2014, 01:35 PM IST

पुणे-सातारा हायवेवर भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेत सहा ठार

सातारा तालुक्यातील पारगाव खंडाळा इथं भरधाव वेगात असलेला कंटेनर उलटून झालेल्या विचित्र अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Nov 16, 2014, 01:25 PM IST

दिल्ली पुन्हा बलात्कारानं हादरली, आसामच्या महिलेवर गँगरेप

दिल्लीत पुन्हा ‘निर्भया’ सारख्या बलात्कार कांडानं हादरलीय. नराधामांनी घरात घुसून एका महिलेवर बलात्कार केलाय. बलात्कारानंतर त्यांनी त्या मुलीच्या शरीरासोबत खेळ केलाय. पश्चिम दिल्लीतील मुंडका भागात हा प्रकार घडलाय.

Nov 16, 2014, 12:46 PM IST

भाजप-शिवसेना युतीसाठी आता सरसंघचालकांचे प्रयत्न- सूत्र

सेना-भाजप युतीसाठी आता सरसंघचालक मोहन भागवतांनी प्रयत्न सुरु केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. युती बाबत शिवसेना आणि मोहन भागवतांमध्ये चर्चा झाल्याचंही कळतं. 

Nov 16, 2014, 12:06 PM IST

वर्ध्यात नरबळी: मांत्रिकानं मुलाचे डोळे, किडनी भाजून खाल्ली

संपूर्ण वर्धा जिल्ह्यात खळबळ माजवून देणार्याी रूपेश मुडे या बालकाच्या हत्याप्रकरणाचे धागेदोरे सापडले असून या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.रुपेश मुळेची हत्या अघोरी विद्येतून नरबळी असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. 

Nov 16, 2014, 11:33 AM IST

आता व्हॉट्स अॅपवरील ‘ब्लू टिक’चं टेंशनही घालवा!

भारतच नव्हे संपूर्ण जगात दररोज वापरात येणारी सेवा म्हणजे व्हॉट्स अॅप मॅसेजिंग... व्हॉट्स अॅपनं नुकतीच आपली 'रिड रिसीट' सेवा सुरू केलीय. यामुळं आपण कोणाचा आलेला मॅसेज वाचला, किंवा आपण पाठवलेला समोरच्यांनी वाचला तर ब्लू टीक येते. पण यामुळं अनेकांना त्रास होऊ लागलाय. 

Nov 16, 2014, 11:13 AM IST

सचिननं दत्तक घेतलं आंध्रप्रदेशातील गाव!

माजी क्रिकेटपटू आणि राज्यसभा सदस्य सचिन तेंडूलकरनं आंध्र प्रदेशमधील नेलोरे जिल्ह्यातील पी.आर. कांडरिगा हे गाव आदर्श ग्राम योजनं अंतर्गत दत्तक घेतलंय. 

Nov 16, 2014, 10:40 AM IST

पाक सैनिकांना चीनकडून धडे! सीमेलगत हालचाली वाढल्या

भारतीय सीमेत वारंवार घुसखोरी करणारा कुरापतखोर चीन आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैनिकांना शस्त्र प्रशिक्षण देत असल्याचं वृत्त आहे. जम्मू-काश्मीरच्या राजौरीजवळ असलेल्या पाकव्याप्त काश्मिरातील काही चौक्यांमध्ये हे प्रशिक्षण दिलं जात असल्याचा अहवाल सीमा सुरक्षा दलानं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांना सादर केल्याचं वृत्त आहे.

Nov 16, 2014, 09:43 AM IST

भरधाव वेगानं येणाऱ्या गाडीनं ५ लोकांना उडवलं!

‘बड्या बापाचा बिगडा हुआ बेटा’नं मुंबईत पुन्हा एकदा वेगानं गाडी चालवून निष्पाप लोकांना उडवलंय. अंधेरी परिसरात एका भरधाव गाडीखाली पाच जणांना चिरडल्याचा प्रकार समोर आला आहे. अंधेरीतील चिनॉय महाविद्यालय या भागात ही घटना घडली आहे. वीस वर्षीय युवकाकडून हा अपघात घडला आहे.

Nov 16, 2014, 09:16 AM IST