24taas

सोफियानं आपला न्यूड फोटो रोहितला केला समर्पित

बिग बॉसच्या आधीच्या सिझनची स्पर्धक आणि मॉडेस सोफिया हयात हीनं रोहित शर्माच्या रेकॉर्डचं अभिनंदन जरा वेगळ्याच पद्धतीनं केलंय. तिनं आपला न्यूड फोटो ट्विटरवर पोस्ट केला होता. पण रोहित शर्माच्या रेकॉर्डनंतर आपला फोटो त्याला समर्पित केला. 

Nov 13, 2014, 07:28 PM IST

पाहा: जगातील सर्वात उंच आणि ठेंगणा व्यक्ती भेटतो तेव्हा!

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या ६०व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेल्या जगातील सर्वात उंच आणि ठेंगण्या व्यक्तींची लंडनमध्ये भेट झाली.

Nov 13, 2014, 06:37 PM IST

शिवसेना-भाजपच्या उडालेल्या खटक्यांचे पडसाद कोकणात

 भाजपच्या बरोबरीनं शिवसेना सत्तेत सहभागी होईल आणि त्यातून कोकणाच्या वाट्याला मंत्रिपद येईल अशी आशा कोकणातल्या इच्छुक आमदारांना होती. मात्र विरोधी बाकावर बसण्याच्या निर्णयानं कोकणातल्या दिग्गज नेत्यांच्या इच्छा आकांक्षांवर पाणी फेरलं गेलंय. तसंच शिवसेना-भाजपच्या उडालेल्या खटक्यांचे पडसाद कोकणात स्थानिक पातळीवरही पहायला मिळतील असं चित्र आहे. 

Nov 13, 2014, 06:16 PM IST

ओबामांनी मोदींना म्हटलं ‘मॅन ऑफ अॅक्शन’!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी पुन्हा एकदा मोदीस्तुती केलीये. मोदींना अन्य कोणत्याही जागतिक नेत्यापेक्षा जास्त उत्साहानं भेटत ओबामांनी ‘मॅन ऑफ अॅक्शन’ असे कौतुगोद्गार काढले. 

Nov 13, 2014, 06:01 PM IST

कोबीचे अनेक लाभ, आरोग्यासाठी लाभदायक

पालेभाज्यांमध्ये कोबी अतिशय लाभदायक मानली जाते. यात असे अनेक गुण आहेत जे आपल्या शरीराला  निरोगी ठेवतात. विशेष म्हणजे कोबीमुळं आपलं पोट साफ राहतं, बद्धकोष्ठता दूर राखण्यात कोबी मदत करते. कोबीला भाजीशिवाय सॅलड म्हणूनही खाल्लं जातं. 

Nov 13, 2014, 04:34 PM IST

स्वच्छ भारत अभियानासाठी शाहरुखचा नकार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानाला सेलिब्रिटी आणि राजकारणी यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळत असला तरी अभिनेता शाहरुख खान यानं मोदींच्या या अभियानासाठी हातात झाडू घेणार नसल्याचं स्पष्ट केलंय. मात्र मोदींच्या या अभियानाला पाठिंबा दर्शवत जनतेमध्ये स्वच्छतेचा संदेश पोहोचत असल्याचं शाहरुखनं म्हटलंय. 

Nov 13, 2014, 03:25 PM IST

'मरे' फास्ट होणार, 15 नोव्हेंबरपासून नवं वेळापत्रक

मध्य रेल्वेचा प्रवास आणखी फास्ट होणार आहे. मध्य रेल्वेचं नवं वेळापत्रक 15 नोव्हेंबरपासून लागू होतंय. या नव्या वेळापत्रकात लोकल फेऱ्या वाढवण्यात आल्यात. या विस्तारामुळं लांब अंतरावरील प्रवाशांना फायदा होणार आहे. 

Nov 13, 2014, 02:49 PM IST

अमेरिकेनंतर आता पंतप्रधान मोदींचा ऑस्ट्रेलियातही जलवा!

अमेरिकेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जलवा ऑस्ट्रेलियातही पहायला मिळणार आहे. सिडनीच्या ऑलफोन्स अरेना या प्रसिद्ध इव्हेंट सेंटरवर 17 नोव्हेंबरला मोदी सभा घेणार आहेत. तब्बल 27 हजार अनिवासी भारतीय यावेळी उपस्थित असतील. 

Nov 13, 2014, 01:56 PM IST

भारतीय वंशाच्या 8 वर्षांच्या सीईओचं सायबर सुरक्षा समिटमध्ये भाषण

सायबर सिक्युरिटी समिटमध्ये भारतीय वंशांच्या आठ वर्षाचा मुलगा लेक्चर देणार आहे. ही समिट गुरुवारपासून सुरू होणार आहे. यात लेक्चर देणाऱ्यांमध्ये परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांचा सुद्धा समावेश आहे. 30 टक्के शालेय विद्यार्थी सायबर क्राइमचा सामना करतात. 

Nov 13, 2014, 01:43 PM IST

मतदानावेळी शिवसेना सभागृहाबाहेर होती, भुजबळांचा आरोप

आवाजी मतदानानं भाजप सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला. पण शिवसेना आणि काँग्रेस पक्षानं त्यावर आक्षेप घेत पुन्हा विश्वासदर्शक ठराव घेण्याची मतदानाची मागणी केलीय. यावर बोलतांना राष्ट्रवादी काँग्रसचे नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेवर घणाघाती आरोप केलाय. जेव्हा मतदानाची वेळ आली तेव्हा शिवसेनेचे आमदार सभागृहाबाहेर गेले, असं भुजबळ म्हणाले. 

Nov 12, 2014, 09:09 PM IST

राज्यात २४ तास वीज आणि पाणी देणार, राज्यपालांचा अभिभाषणात निर्धार

राज्यात २४ तास वीज आणि पाणी, राज्यांतील प्रमुख शहरांना जोडण्यासाठी महामार्ग आणि एक्सप्रेस वेची बांधणी, सहकारी बँकांचं पुनरुज्जीवन, पोलिस दलाचं आधुनिकीकरण असा फडणवीस सरकारचा अजेंडा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी विधीमंडळातील अभिभाषणातून मांडला आहे. राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान शिवसेना आमदारांनी राज्यपाल चले जाव, दादागिरी नही चलेगी अशी घोषण देत विरोध दर्शवला. 

Nov 12, 2014, 08:08 PM IST

'महाभारत'चे दिग्दर्शक रवी चोप्रा यांचं निधन

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक रवि चोप्रा यांचं आज मुंबईत निधन झालं. ते ६८ वर्षांचे होते. बागवान, द बर्निंग ट्रेन,बाबुल या सिनेमाचं दिग्दर्शन  रवि चोप्रा यांनी केलं होतं. तसंच 80च्या दशकात गाजलेल्या महाभारत या टीव्ही सिरिअलचं दिग्दर्शनही त्यांनी केलं होतं.

Nov 12, 2014, 07:05 PM IST