सोने आणि रूपयाचा भाव घसरला
रुपयाच्या किमतीत मागील नऊ महिन्यांतील नीचांकी घसरण झाली आहे. तसेच डॉलर आणखी मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी घट झाली आहे.
Nov 20, 2014, 08:39 PM ISTसोन्याची ‘दिल खोल के’ खरेदी करताय? सावधान...
सोन्याच्या किंमतीमध्ये दिवसेंदिवस घट होत चालल्यानं भारतात ऑक्टोबर २०१४ मध्ये जवळपास ३०० टक्क्यांनी सोन्याची आयात वाढलीय... हेच कारण ठरलंय केंद्र सरकारच्या चिंतेचं... त्यामुळे, आता यावर उपाय काढायलाच हवा, या दृष्टीने येत्या दोन दिवसांत पावलं उचलण्यात येणार असल्याचं समजतंय.
Nov 19, 2014, 05:06 PM ISTआता रोज करा सोने खरेदी.. सोन्याचा भाव आणखी घसरला...
सोन्याचा भाव दिवसेंदिवस कमी होत चाललाय. सतत बाराव्या दिवशी देखील सोन्याचा गेलेला दिसतोय.
Nov 15, 2014, 11:44 AM ISTमोदी इफेक्ट! सोन्याचे दर मागील 4 वर्षात सर्वात खाली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उचललेल्या सकारात्मक धोरणांमुळे शेअर बाजार नवनवीन रेकॉर्ड करतंय. तर याचा परिणाम सराफा बाजारावर पण पडतोय. दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याचे दर 345 रुपयांनी कमी होत 26,050 रुपये प्रति 10 ग्रामवर आले आहेत. सोन्याचे हे दर गेल्या 4 वर्षात सर्वात कमी झाले आहेत.
Nov 11, 2014, 06:46 PM ISTआनंदाची बातमी: सोनं-चांदी आणखी स्वस्त
डॉलरच्या मजबुतीनं मौल्यवान धातूंची मागणी कमजोर झाल्यानं राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात आज सोनं-चांदीचा भाव अनेक वर्षांनी नीचांकी पातळीवर गेला. सोन्याचा भाव २५,८०० रुपये प्रति दहा ग्रॅम, तर चांदी ३४,९०० रुपये प्रतिकिलोवर बंद झाला.
Nov 9, 2014, 04:35 PM ISTखूशखबर... सोने डिसेंबरपर्यंत २५ हजारांवर!
तुळशीच्या विवाहानंतर लग्नाचा मौसम सुरू होईल. त्यामुळं मुहूर्तांसाठी वधुपित्यांची घाई सुरू झाली आहे. त्यातच धनत्रयोदशीनंतर सोन्याचे भाव हळूहळू घसरू लागल्यामुळं सर्वांनी आतापासूनच सराफा दुकानांमध्ये गर्दी करायला सुरुवात केली आहे. दरम्यान डिसेंबरपर्यंत सोन्याचे भाव २५ हजार रुपयांपर्यंत खाली येतील, असं अर्थतज्ज्ञांनी म्हटलंय. त्यामुळं यंदा लग्नाचे बार आता दणक्यात उडणार आहेत.
Nov 5, 2014, 09:21 AM ISTवधुपित्यांना खुशखबर... सोनं ६०० रुपयांनी स्वस्त
तुळशी विवाहानंतर लग्नाच्या मौसमाला सुरुवात होईल. फेब्रुवारीपर्यंत लग्नाचे बार उडतील. त्यामुळे मुहूर्त शोधण्यासाठी वधुपित्यांची लगबग सुरू झाली आहे. मुहूर्त सापडल्यानंतर बस्ता बांधण्यासाठी आणि सोनं खरेदीसाठी झुंबड उडेल. मात्र, लग्नसराईसाठी दणक्यात सोने खरेदी करणार्या वधुपक्षासाठी मोठी खुशखबर आहे. सोन्याच्या भावात घसरण झाली असून वधुपित्यांसाठी ही खूप मोठी खुशखबर आहे. जागतिक बाजारपेठेत सोन्याचे भाव घसरल्यामुळे सोने ६०० रुपयांनी उतरून २६ हजार ५०० प्रति तोळा इतके झाले आहे.
Nov 1, 2014, 09:58 AM ISTसलग तिसऱ्या दिवशी घसरले सोन्याचे दर!
सोन्याच्या दरांत सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाल्याचं दिसून येतंय... शुक्रवारीही सोन्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात घसरली.
Oct 25, 2014, 05:27 PM ISTभारतीयांकडे २० हजार टन सोने
सोने आणि दागिन्यांचा मोह भारतीय नागरिकांना पुरातन काळापासून आहे. एका जागतिक सर्वेक्षणानुसार सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या भारतात सध्या २० हजार टन सोन्याचा साठा आहे. त्याची किंमत ५,५२० अब्ज रुपये इतकी आहे.
Oct 24, 2014, 09:49 AM ISTदिवाळीत सोने-चांदी दरात घट
जागतिक बाजारातील नरमाई, दागिने निर्माते आणि किरकोळ विक्रेते यांच्याकडून असलेल्या मागणीतील घट, तसेच औद्योगिक क्षेत्राने खरेदीकडे फिरविलेली पाठ यामुळे राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी मंदीची चाल दिसून आली. सोने ७५ रुपयांनी उतरून २७,८५० रुपये तोळा, तर चांदी १०० रुपयांनी उतरून ३८,९०० रुपये किलो झाली. मुंबईत शुद्ध सोन्याचा भाव २७६४० रुपये प्रति तोळा तर २२ कॅरेट सोन्याचा भाव २५,८४३ रुपये आहे.
Oct 23, 2014, 08:35 AM ISTचक्क सोने तस्करीला लगाम
सोन्याला जास्तच भाव आल्याने तस्करीमध्ये वाढ झाली होती. याला आता लगाम बसणार आहे. कस्टम विभागाने तस्करी रोखण्यासाठी बारीक नजर ठेवली आहे. त्यातच तस्करीमध्ये गुंतलेल्या टोळ्यांना जास्त लाभ होत नसल्याने त्यांचीही पाठ फिरु लागली आहे.
Oct 22, 2014, 11:13 AM ISTदसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईकरांनी सोनं लुटलं!
मुंबईः ‘विजयादशमी’ हा साडेतीन मुहूर्तपैकी एक मुहूर्त आहे. या मुहूर्तावर सोने खरेदी करण्यासाठी मुंबईकरांची सराफच्या दुकानात झुंबड उडाली होती. गेल्या चार वर्षांच्या तुलनेत यंदा सोन्याच्या दरात कमालीची घट झालेली दिसून येते. तोळ्यामागे सोन्याचा दर 27 हजारांच्या जवळपास आहे. तर चांदी 40 हजारच्या खाली आल्यामुळे दागिन्याची देखील मागणी वाढली आहे.
Oct 4, 2014, 07:56 PM IST
जळगावात सोनं खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 3, 2014, 08:42 PM ISTपंचांच्या चुकीच्या निर्णयाचा बळी; ढसाढसा रडली सरिता देवी
आशियाई खेळांत ६० किलोग्रॅम गटात भारतीय बॉक्सर सरिता देवी आज पंचांच्या चुकीच्या निर्णयाची बळी ठरलीय.
Oct 1, 2014, 02:14 PM ISTमेरी कोमने पटकावलं सुवर्णपदक
भारताची स्टार बॉक्सर मेरी कोमने सुवर्णपदक पटकावलं आहे. एशियाडमध्ये मेरीला पहिल्यांदाच गोल्ड मेडल मिळालं आहे. मेरी कोम दोन मुलांची आई आहे.
Oct 1, 2014, 12:09 PM IST