politics

सोशल मीडियावरून राजकारण सुरू

राज्यात आता सोशल मीडीयावरून राजकारण सुरु झालंय. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर अतिशय प्रभावी ठरला, पण याच प्रभावी माध्यमाचा गैरवापर महापुरूषांच्या बदनामीसाठी होत असल्यानं गेल्या काही दिवसांत राज्यातील सामाजिक सलोखा बिघडत चाललाय. त्यामुळं सोशल मीडियाच्या वापरावर राज्य सरकार काही निर्बंध लागू करण्याच्या विचारात आहे...

Jun 10, 2014, 07:54 PM IST

`डर्टी पॉलिटिक्स`चा फर्स्ट लूक आणि वाद...

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतचं नाव असेल आणि तिथे वाद-विवाद झाला नाही, तरच आश्चर्य... आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा तिनं मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेतलीय त्यासोबतच एक नवा वाद उभा राहिलेला दिसलाय. आत्ताही काही वेगळी स्थिती नाही.

May 31, 2014, 11:09 PM IST

...तर राजकारणातून संन्यास घेईल- मोदी

कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बात्रा आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल मला आदर आहे. हुतात्मा झालेल्या जवानांचा अपमान करण्यापेक्षा राजकारणातून संन्यास घेईल, असे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी बुधवारी म्हटले आहे.

Apr 30, 2014, 01:22 PM IST

दोन्ही काँग्रेसने जातीपातीची पिलावळ पोसली - राज ठाकरे

राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष जातीपातीचे राजकारण करीत आहे. त्यांनीच जातीपातीची पिलावळ बोसली आहे, अशी खरमरीत टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आघाडीवर केली. त्याचवेळी महायुतीला लक्ष्य केले. मनसेचे पुण्यातील उमेदवार दीपक पायगुडे यांच्या प्रचार सभेत राज यांनी हल्लाबोल केला.

Apr 15, 2014, 03:40 PM IST

फिल्म रिव्ह्यू : निवडणुकीच्या रंगात `भूतनाथ` परतला

दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा `भूतनाथ रिटर्न्स` हा सिनेमा शुक्रवारी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झालाय.

Apr 12, 2014, 12:00 PM IST

आंध्रप्रदेश : राजकीय इतिहास आणि सध्याची समीकरणं

दक्षिणेतील महत्वाचं राज्य आंध्र, आंध्र प्रदेशाला मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्योत्तर काळात झालेल्या भाषावार विभाजनानंतर आंध्रची निर्मिती झाली. आता पुन्हा आंध्रच्या विभाजनासाठी आंदोलन सुरु आहे. राजधानी हैदराबादचा प्रश्न आजही चिघळतोय.

Apr 4, 2014, 11:20 PM IST

तामिळनाडू : सत्तापालट होणार?

स्वतंत्र द्रविड नाडुची मागणी, हिंदीला विरोध, प्रत्येक निवडणुकीत सत्तापालट अशी काही तामिळनाडूच्या राजकारणाच्या वैशिष्ट्य राहिलीत. तामिळनाडूच्या राजकारणाचा इतिहास नेमका कसा आहे, हे सांगणारा हा एक लेखाजोखा...

Apr 4, 2014, 11:10 PM IST

प्रियंकाने राजकारणात यावं, पण ... - राहुल गांधी

प्रियंका गांधी यांनी राजकारणात यावं अशी आपली इच्छा आहे, पण त्यांना प्रकाशझोतात यायचे नाही, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं. राहुल गांधी काल मुंबईत काही पत्रकारांशी बोलत होते.

Mar 6, 2014, 11:47 AM IST

`सन डे` राजकारणातला `फन डे`

निवडणुकांजवळ येत असताना आजचा रविवार राजकीय ठरणार आहे. भाजप, कॉँग्रेस आणि आपच्या नेत्यांच्या आज देशात विविध ठिकाणी सभा होताय.

Feb 23, 2014, 02:26 PM IST

अशोक चव्हाण राजकारणात पुन्हा सक्रीय

आदर्श घोटाळ्यानंतर जणू नांदेडपर्यंतच मर्यादित राहिलेले अशोक चव्हाण आता निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा रिंगणात उतरले आहेत.. ब-याच महिन्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी नांदेड सोडून औरंगाबादमध्ये दोन सभा घेतल्या. त्यांच्या देहबोलिवरून आता अशोच चव्हाण पुन्हा जोमाने दंड थोपटून राजकारणार परतणार अशीच चिन्हं दिसत आहेत.

Feb 15, 2014, 01:51 PM IST

शरद पवारांचा राजकीय खेळ कुणाला कळला?

आगामी लोकसभा निवडणुकीनंतर त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. काँग्रेसप्रणित यूपीए सरकारचा पराभव झाला, परंतु भाजपप्रणित एनडीएलाही स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर...? अशा परिस्थितीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची राजकीय चाल महत्त्वाची ठरणार आहे.

Feb 1, 2014, 12:02 AM IST

पक्षांची ऑफर, पण राजकारण नको- नाना

औरंगाबादेत पहिल्या आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्धघाटनानंतर अभिनेता नाना पाटेकरनं राजकीय पक्षांची आपल्या शैलीत टर्र उडवली..

Jan 30, 2014, 10:52 PM IST

गुत्थी अडचणीत येण्याची शक्यता?

आपल्या विनोदानं सर्वांच्या मनात घर करणा-या गुत्थी म्हणजेच कॉमेडीयन सुनील ग्रोवरला हाच विनोद आता अडचणीत आणू शकतो...

Jan 21, 2014, 07:32 PM IST

शीतल म्हात्रे प्रकरणः ठाकरेंनी नाही महिला आयोगाने घेतली दखल

शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांच्याकडून आपल्याला मानसिक त्रास होत असल्याने शिवसेना नगरसेवकपदाचा राजीनामा देण्याची तयारी करणाऱ्या नगरसेवक शीतल म्हात्रे यांच्या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली आहे.

Jan 16, 2014, 04:59 PM IST

शिवसेनेच्या शीतल म्हात्रे यांचा राजीनामा मागे

शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांच्याकडून आपल्याला मानसिक त्रास होत आहे, म्हणून आपण शिवसेना नगरसेवकपदाचा राजीनामा देणार आहोत, असं नगरसेवक शीतल म्हात्रे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यान, रात्री उशिरा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी आपला राजीनामा पाठिमागे घेतला.

Jan 16, 2014, 09:24 AM IST