raj thackeray

नाशकात सत्ताधारी मनसेवरच आंदोलनाची वेळ

नाशिक महापालिकेत आज सत्ताधारी मनसेवरच आंदोलन करण्याची वेळ आली. तर विरोधकांनीही लगेचच ही मनसेची नौटंकी असल्याचं म्हणत खिल्ली उडवली. पण या सगळ्या गदारोळात महापालिकेचं आजचं काम रखडलं.. 

Jul 23, 2014, 05:40 PM IST

नारायण राणेंना उद्धव ठाकरेंचे चोख प्रत्युत्तर

 काँग्रेस नेते आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावर टीका न करता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे समर्थक रवींद्र फाटक यांना पक्षात घेऊन करुन दाखवलं.  

Jul 19, 2014, 03:19 PM IST

राज ठाकरे यांनी मराठवाड्यातून लढावे – बाळा नांदगावकर

मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अनुशेष बाकी आहे. शिवाय या भागात मोठ्या प्रमाणात मागासलेपण आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी मराठवाड्यातून विधानसभा निवडणूक लढवावी असे मत आज मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी जालन्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

Jul 17, 2014, 06:59 PM IST

‘मातोश्रीत बसून डरकाळ्या काय फोडता, बाहेर पडा’

सध्या, राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्धार मेळावा कोल्हापूर मेळावा सुरू आहे. या मेळाव्यात जाहीर भाषणात अजित पवार यांनी ठाकरे बंधुंना चांगलेच टोले हाणलेत. 

Jul 15, 2014, 03:26 PM IST

टीका मोदींवर नाही सोशल मीडियावर – राज

सोशल मीडियाबाबत आपण केलेल्या विधानाचा विपर्यास करण्यात आलाय, नरेंद्र मोदींची लाट विरली असं आपण बोललो नव्हतो असा खुलासा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलाय.  

Jul 14, 2014, 11:46 AM IST

राज ठाकरेंचा 'मोदी जोक' भाजपच्या जिव्हारी!

 मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जोरदार खिल्ली उडवलीय. त्यामुळं भाजप नेते राज ठाकरेंवर चांगलेच खट्टू झालेत. कधीकाळी 'चाय पे चर्चा' करणाऱ्या राज आणि भाजप नेत्यांमध्ये त्यावरून मैत्रीपूर्ण सामना रंगू लागलाय.

Jul 12, 2014, 10:08 AM IST

लॉन्च करायला अमित काय रॉकेट आहे का- राज ठाकरे

अमितला लॉन्च करायला तो काय रॉकेट आहे का, असा खास ठाकरी शैलीत प्रश्न विचारून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांचा राजकारणात प्रवेशांच्या चर्चांना पूर्ण विराम दिला. योग्य वेळ आली तेव्हा अमितला मी राजकारणात आणेल, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. 

Jul 11, 2014, 05:12 PM IST

मनसे आमदार वसंत गितेंची राज ठाकरेंच्या बैठकीला दांडी

राज्यात मनसेची पायाभरणी करणाऱ्या नाशिक मनसेतील नाराजीनाट्याचा दुसरा अंक सुरु झालाय. स्थायी समिती निवडीवरुन सुरु झालेल्या या नाट्यात, आता राज ठाकरेंनी घेतलेल्या बैठकीला मनसे आमदार वसंत गिते गैरहजर राहिले आहेत. तसंच मनसेच्या 40 पैकी 20 नगरसेवकांनीही या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. 

Jul 6, 2014, 07:43 PM IST

नाशिकमध्ये राज ठाकरे गटबाजी कशी रोखणार?

राज्यात मनसेची पायाभरणी करणा-या नाशिकमध्ये सध्या दुफळी निर्माण झालीय. स्थायी समितीच्या सभापतीपदावरून प्रदेश सरचिटणीस वसंत गिते सध्या नाराज आहेत. 

Jul 6, 2014, 05:15 PM IST

गटबाजी उफाळली, राज नाशिकला रवाना

शहरात नाराजी नाट्य सुरू झालं आहे, हे नाराजी नाट्य एवढं टोकाला गेलं आहे की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकला रवाना झाले आहेत. 

Jul 6, 2014, 02:25 PM IST