Budget Car: ५० हजार पगार असेल तर कोणती बजेट कार घ्याल? AI ने दिले अचूक उत्तर

Car Budget According to Salary: लोकप्रिय प्लॅटफॉर्म चॅट जीपीटीने सांगितले आहे की, 50 हजार रुपये मासिक पगार असलेल्या व्यक्तीने सुमारे 5 ते 6 लाख रुपयांची कार खरेदी करावी.

Pravin Dabholkar | Updated: Jul 4, 2023, 09:11 PM IST
Budget Car: ५० हजार पगार असेल तर कोणती बजेट कार घ्याल? AI ने दिले अचूक उत्तर  title=

Car Budget According to Salary: कार खरेदी करणे हे प्रत्येकाचे स्पप्न असते. पण कारच्या किमती इतक्या झपाट्याने वाढत आहेत की  4 ते 5 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत स्वस्त कारही मिळत नाही. सर्वसाधारणपणे लोक कार खरेदी करण्यासाठी कर्जाचा पर्याय निवडतात पण कालांतराने ईएमआयची परतफेड करणे कठीण होते. म्हणूनच योग्य बजेट कार निवडणे ही कार खरेदी करण्याची पहिली पायरी आहे.

भारतातील बहुतेक लोकांचे मासिक उत्पन्न 50 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. त्यामुळे अशा लोकांसाठी कार खरेदी करणे थोडे कठीण असते. जर एखादी व्यक्ती दरमहा 50 हजार रुपये कमावत असेल तर त्याने त्याच बजेटनुसार कार खरेदी करावी.  50 हजार रुपये मासिक पगार असलेल्या व्यक्तीने कोणती बजेट कार खरेदी करावी? असा प्रश्न पडतो. चॅट GPT (AI) ने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. 

50 हजार रुपये पगार असलेल्या व्यक्तीने कोणती बजेट कार खरेदी करावी?

लोकप्रिय प्लॅटफॉर्म चॅट जीपीटीने सांगितले आहे की, 50 हजार रुपये मासिक पगार असलेल्या व्यक्तीने सुमारे 5 ते 6 लाख रुपयांची कार खरेदी करावी. जर त्याला बजेट आणखी थोडे वाढवायचे असेल तर तो कर्ज घेऊ शकतो किंवा इतर काही आर्थिक योजना निवडू शकतो. तथापि, आपण आर्थिक नियमानुसार कर्ज देखील घ्यावे.

कर्जावर घेतलेल्या नवीन कारचे बजेट आर्थिक नियम 20-4-10 द्वारे निश्चित केले जाऊ शकते. या नियमानुसार पगाराच्या २० टक्के रक्कम डाऊन पेमेंट म्हणून खर्च करावी लागते. त्यानंतर, कर्जाचा कालावधी कमाल 4 वर्षांचा असावा आणि EMI रक्कम पगाराच्या 10% पेक्षा जास्त नसावी. याचे पालन केल्याने व्यक्तीची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि तो आपल्या कारचा आनंदाने वापर करु शकेल. 

या बजेटमध्ये कोणत्या गाड्या येतात?

1. मारुती सुझुकी अल्टो K10 - किंमत 4 लाख रुपयांपासून सुरू 
2. मारुती सुझुकी एस-प्रेसो - किंमत 4.25 लाख रुपयांपासून सुरू 
3. मारुती सुझुकी वॅगन आर - किंमत 5.54 लाख रुपयांपासून सुरू 
4. टाटा टियागो - किंमत 5.54 लाख रुपयांपासून सुरू 
5. टाटा पंच - किंमत 6 लाख रुपयांपासून सुरू 
6. मारुती सुझुकी सेलेरियो - किंमत 5.37 लाख रुपयांपासून सुरू 
7. मारुती सुझुकी इग्निस - किंमत 5.84 लाख रुपयांपासून सुरू 
8. Hyundai Grand i10 Nios - किंमत 5.73 लाख रुपयांपासून सुरू
9. Renault KWID - किंमत 4.7 लाख रुपयांपासून सुरू