Whatsapp Banking : आता बँकेत न जाता व्हॉट्सअ‍ॅपवरुन करता येणार अनेक कामे, या मोठ्या सरकारी बँकेची नवी सुविधा

Whatsapp Banking : क्षेत्र कोणतेही असो, आजकाल तंत्रज्ञानाचा वापर प्रत्येकासाठी आवश्यक झाला आहे. आता बँकेत न जाता व्हॉट्सअ‍ॅपवरुन अनेक कामे करता येणार आहेत. 

Updated: Jul 19, 2022, 07:41 AM IST
Whatsapp Banking : आता बँकेत न जाता व्हॉट्सअ‍ॅपवरुन करता येणार अनेक कामे, या मोठ्या सरकारी बँकेची नवी सुविधा title=

मुंबई : Whatsapp Banking : क्षेत्र कोणतेही असो, आजकाल तंत्रज्ञानाचा वापर प्रत्येकासाठी आवश्यक झाला आहे. आता बँकेत न जाता व्हॉट्सअ‍ॅपवरुन अनेक कामे करता येणार आहेत. देशातील सर्वात मोठी बँक SBI ने (Whatsapp Banking in State Bank Of India) देखील तंत्रज्ञानाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत WhatsApp बँकिंग सुरु केले आहे. या नवीन सुविधेमुळे तुम्ही शाखेत न जाता फक्त Whatsapp द्वारे बरीच कामे करु शकणार आहात. बँकेने जारी केलेल्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर चॅट करुन तुम्ही तुमच्या बँक बॅलन्सची आणि मिनी स्टेटमेंटची माहिती मिळवू शकाल. 

याचा वापर कसा करायचा ते जाणून घ्या

सर्वप्रथम तुम्हाला SBI मध्ये याबाबत नोंदणी करावी लागेल. त्यासाठी WAREG लिहून स्पेस द्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा खाते क्रमांक लिहून 7208933148 वर एसएमएस पाठवावा लागेल. हा संदेश पाठवण्याचे स्वरुप पुढीलप्रमाणे आहे. WAREG <space>खाते क्रमांक आणि 7208933148 वर पाठवा. मेसेज पाठवताना, तुमच्या SBI खात्यात नोंदणीकृत असलेल्या त्याच नंबरवरुन मेसेज पाठवण्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. तुमची नोंदणी पूर्ण झाल्यावर, तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर एसबीआयच्या 90226 90226 क्रमांकावरून एक मेसेज येईल. आपण इच्छित असल्यास, आपण हा नंबर सेव्ह देखील करु शकता.

तुम्ही चॅटही करु शकता

जेव्हा तुम्ही बँकेत नोंदणी करता तेव्हा तुम्ही हाय टाइप करुन चॅटिंग सुरु करु शकता. यानंतर SBI कडून एक मेसेज येईल आणि आवश्यक गोष्टी तुम्हाला मदत करण्यास सांगितले जाईल. हा संदेश असा असेल- 

प्रिय ग्राहक, SBI Whatsapp बँकिंग सेवांमध्ये आपले स्वागत आहे!
कृपया खालीलपैकी कोणत्याही पर्यायातून निवडा.
1. खाते शिल्लक
2. मिनी स्टेटमेंट
3. व्हाट्सएप बँकिंग वरुन नोंदणी रद्द
करा तुम्ही तुमची शंका देखील टाइप करु शकता.

Dear Customer, Welcome to SBI Whatsapp Banking Services!
Please choose from any of the options below.
1. Account Balance
2. Mini Statement
3. De-register from WhatsApp Banking
You may also type your query to get started.

तुम्ही तुमच्या गरजेनुसार सुविधा वापरु शकता

हा संदेश वाचल्यानंतर तुम्ही तुमच्या गरजेनुसार सुविधेचा लाभ घेऊ शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही 1 टाइप करुन पाठवले, तर तुमच्या चॅटिंगवर खात्यातील शिल्लक माहिती येईल. दुसरीकडे, 2 टाईप केल्यावर, तुम्हाला मिनी स्टेटमेंटचा तपशील मिळेल. त्याचवेळी, 3 टाइप करुन, तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप बँकिंगमधून नोंदणी रद्द करण्याची सुविधा मिळेल.

सुविधा 24 तास 7 दिवस उपलब्ध 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या एसबीआयच्या या व्हॉट्सअ‍ॅप बँकिंगवर तुम्हाला फक्त या 3 सुविधा मिळतील. वेळ आल्यावर हळूहळू या कामात आणखी सुविधा जोडल्या जातील. या सुविधेचा फायदा घेऊन तुम्ही बँकेत जाण्याचा आणि तिथल्या लांबच्या लांब रांगेत उभे राहण्याचा त्रास टाळू शकता. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ही सुविधा तुम्हाला 24 तास 7 दिवस उपलब्ध असेल, ज्यामुळे तुमच्या कामाचा वेगही वाढेल.