मुंबई : Tata Motors ने भारतात आपली सर्वात नवीन इलेक्ट्रिक कार Tata Curv EV ग्राहकांच्या भेटीला आणली आहे. या इलेक्ट्रिक कारचं डिझाइन अतिशय सुंदर आहे. एवढंच काय तर केबिनच्या बाबतीतही ईव्हीला उत्तम बनवण्यात आलं आहे. नवीन इलेक्ट्रिक कार कूपे स्टाईलवर बनवली गेली आहे आणि सध्याच्या SUV लाइनअपमधील सर्वात महागडी कार म्हणून तिची ओळख आहे.
तसे पाहाता टाटा म्हटलं की ग्राहकांना जास्त विचार देखील करावा लागत नाही. हे अलिकडेच टाटाच्या इलेक्ट्रिक कारच्या विक्रिवरुन तुमच्या लक्षात आलंच असेल. अशा स्थितीत ही नवी टाटा इलेक्ट्रिक कार बाजारातील वातावरण आणखी तापवू शकते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
कंपनीने या इलेक्ट्रिक कारची स्टाईल आणि डिझाईन खूप चांगले ठेवले आहे, ज्यामुळे नवीन Tata Curve दिसायला खूप सुंदर झाली आहे. त्याच्या पुढच्या भागात एलईडी हेडलॅम्प्स देण्यात आले आहेत, तर मागील बाजूने ती दिसायला अतिशय मजबूत आहे.
- इलेक्ट्रिक कारसाठी डिझाइन केलेल्या या दुसऱ्या पिढीच्या आर्किटेक्चरमध्ये, ही कार 400-500 किमीची रेंज देते आणि त्यातील बॅटरी जलद आणि कमी पॉवरमध्ये चार्ज होऊ शकते.
- ही कार एसी आणि डीसी दोन्ही चार्जिंग पॉईंटवरून चार्ज केली जाऊ शकते.
- Tata Curve ही मध्यम आकाराची SUV आहे आणि तिच्या अगदी खाली Nexon SUV असेल.
- Tata Curve EV ची लांबी Nexon EV सारखीच आहे, तर तिचा व्हीलबेस सुमारे 50 मिमी जास्त आहे. 2023 च्या अखेरीस किंवा 2024 च्या सुरुवातीला ही नवीन इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात लॉन्च होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.
काही काळापासून असे दिसून आले आहे की, टाटा मोटर्स आपल्या कार कॉन्सेप्ट मॉडेल प्रमाणेच बनवते, त्यामुळे नवीन कर्व्हची संकल्पना देखील उत्पादन मॉडेल सारखीच असेल.
Tata Curve व्यतिरिक्त आणखी एक SUV आहे, तिला लवकरचं बाजारात आणणार आहे. तिचा नाव टाटा सिएरा इलेक्ट्रिक आहे, जी 25 एप्रिल रोजी सादर केले जाऊ शकते.
टाटाचे म्हणणे आहे की, नवीन इलेक्ट्रिक कारसोबत नवीन तंत्रज्ञानाची पॉवरट्रेन दिली जाईल, जी खूप शक्तिशाली असेल. टाटाच्या इतर नवीन गाड्यांप्रमाणेच, Curve Electric ला देखील ग्लोबल NCAP मध्ये सुरक्षिततेसाठी 5-स्टार रेटिंग मिळेल, असा अंदाज बांधला जात आहे. कारण Tata Curve सोबत कंपनी नक्कीच उत्तम सुरक्षा वैशिष्ट्ये देणार आहे.