अमेरिकेचा पाकिस्तानला मोठा झटका

दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानचा पर्दाफाश हळूहळू आता जगासमोर होत आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 30, 2017, 01:25 PM IST
अमेरिकेचा पाकिस्तानला मोठा झटका title=

वॉशिंग्टन : दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानचा पर्दाफाश हळूहळू आता जगासमोर होत आहे.

पाकिस्तानला आता याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे. अमेरिकेने दहशतवादाविरोधातील कारवाईसाठी पाकिस्तानला दिली जाणारी 255 दशलक्ष अमेरिकन डॉलरची मदत रोखली आहे. अफगाणिस्तानमधील दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानला हा मोठा दणका आहे.
 
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्याचीस संबंधात अमेरिकन धोरणातील ट्रम्प प्रशासन पुनरावलोकन करण्यापूर्वी पेंटागनचा हा निर्णय आला आहे. पाकिस्तानच्या हक्कानी नेटवर्कवर अफगाणिस्तानमधील अमेरिका आणि पाश्चात्त्य सैन्यावर हल्ले करण्याचे अनेक आरोप आहेत. या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तानमधील भारतीय ठिकाणांवर देखील अनेक हल्ले केले आहेत.

काही वेळापूर्वीच पाकिस्तानने अमेरिकेला एकतर्फी कारवाईबाबत बजावले होते. पाकिस्तानी सैन्याने म्हटले होते की, अफगाणिस्तानला सहकार्य करण्याची इच्छा असूनही राष्ट्रीय सन्मान आणि सार्वभौमत्वाच्या संबंधात कोणताही करार केला जाऊ शकत नाही.