आजारी मुलांसाठी ओबामा झाले सांताक्लॉज

पाहा हे व्हिडिओ 

आजारी मुलांसाठी ओबामा झाले सांताक्लॉज title=
मुंबई : अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांच बुधवारी एक वेगळंच रुप पाहायला मिळालं. वॉशिंग्टनच्या नॅशनल चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये लहान मुलांना भेटण्यासाठी ओबामा गेले. पण या वेळी त्यांचा अवतार काहीसा वेगळा होता.. 
 
डोक्यावर लाल टोपी आणि खांद्यावर एका पोटलीत खूप सारे गिफ्ट्स अशा लूकमध्ये सांताक्लॉज बनून ओबामा हॉस्पिटलमध्ये पोहोचले. 
 
ओबामा यांनी लहान मुलांना गिफ्ट्स दिले त्यांच्यासोबत खूप छान वेळ घालवला. ओबामा यांनी या लहान मुलांसोबतचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. 
 
हॉस्पिटलच्या स्टाफने देखील ओबामा यांचे आभार मानले कारण त्यांच्या येण्यामुळे हॉस्पिटलमध्ये एक चैतन्य निर्माण झालं. 
 

तसेच ओबामा या क्षणांबद्दल सांगतात की, मला या मुलांकडून आणि त्यांच्या पालकांकडून खूप प्रेम आणि आनंद मिळाला. दोन मुलांचा बाप होण्याच्या नात्याने माझ्यासाठी सर्वात महत्वाचं आहे की, लहान मुलांची काळजी घेऊ. मुलांची काळजी घेणारे माझ्याजवळ असावेत.

राष्ट्रपदी पदावरून निवृत्त झाल्यावरही ओबामा वॉशिंग्टनमध्येच राहत होते तेव्हा देखील मुलांसाठी ते सांता बनले होते. तेव्हा ओबामांनी शालेय विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. याकरता ते एका क्लबमध्ये गेले होते.