काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये दहशतवाद्यांनी एका स्थानिक टीव्ही स्टेशनवर हल्ला केला आहे. यामध्ये बरेच लोक मारले गेले आहेत आणि काही लोक जखमी झाले आहेत.
प्रत्यक्षदर्शींच्या मते, दहशतवाद्यांनी शमशाद टीव्ही चॅनेलच्या मुख्यालयात ग्रेनेड हल्ला करत प्रवेश केला आणि नंतर अंधाधुंद गोळीबार सुरू केला. एका टीव्ही चॅनल रिपोर्टरने सांगितले की, दहशतवादी अजूनही इमारतीच्या आत आहेत आणि गोळीबाराचा आवाज ऐकू येत आहे.
एका वार्ताहराने एका वृत्तवाहिनीला सांगितले की, त्यांचे अनेक सहकारी ठार झाले आहेत आणि अनेक जण जखमी झाले आहेत. मी तेथून पळ काढला. टीव्ही स्टेशनच्या मुख्यालयात 100 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. या हल्ल्याच्या मागे कोण आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी सांगितले की हल्लेखोरांसह अनेक लोकं मारले गेले आहेत.
काबूल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांच्या गोळीने एक हल्लेखोर मारला गेला आहे. इमारतीचा ताबा मिळवण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे. हल्ला झाल्यानंतर ताबडतोब शमशाद टीव्हीचे प्रसारण थांबले आहे. तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आहे.