सिडनी : सध्या वटवाघूळ सध्या चर्चेत आहेत. भारतातील केरळमध्ये 'निपाह व्हायरस'साठी वटवाघुळांना जबाबदार ठरवलं जात आहे. कारण अजून स्पष्ट झालेलं नाही की, निपाह व्हायरससाठी वटवाघुळं जबाबदार आहेत किंवा नाही, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. तसेच पुण्याच्या लॅबने, केरळहून नमुने आणलेल्या वटवाघूळांबद्दल जे रिपोर्ट दिले आहेत, त्यात संक्रमण झालेलं दिसत नसल्याचं म्हटलं आहे. यामुळे असं म्हणता येत नाही, निपाह हा वटवाघुळांमुळे झाला आहे. वटवाघुळं चर्चेत आल्यानंतर सोशल मीडियावर वटवाघुळांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओ एक वटवाघुळ आणि अजगर यांच्यात एक लढाई दिसून येत आहे. सोशल मीडियावर अनेक जंगलातील व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. मात्र या व्हिडीओ एक वाटवाघुळाची जीवन-मरणासाठीचा संघर्ष दिसून येत आहे.
हा व्हिडीओ ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन शहरातील आहे. जेथे एक वटवाघूळ झाडाला उलटं लटकलेलं आहे. तेव्हा तेथे एक अजगर येतो, तेव्हा वटवाघुळ तेथून निघण्याचा प्रयत्न करतं, पण अजगर आपल्या सापळ्यात वटवाघुळाला जखडतो, आणि त्याला खाण्याचा प्रयत्न देखील करतो.
अजगर वटवाघुळाच्या चारही बाजूने लटकलेला आहे. त्याला मारण्याचा प्रयत्न होत आहे. पण वटवाघुळ सतत संघर्ष करताना दिसत आहे. वटवाघुळासमोर अखेर अजगराला हार मानावी लागली, आणि काही वेळानंतर सापळा सोडून अजगरही निघून जातो.
हा व्हिडीओ मागील वर्षाचा आहे, आणि त्याला टोनी मॉरीसनने आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना टोनी मॉरीसनने म्हटलं आहे, अजगर वटवाघुळाला अर्ध्या तासापासून खाण्याचा प्रयत्न करत होता, पण जेव्हा यात तो अपयशी ठरला, तेव्हा अर्ध्या तासानंतर त्याला खाली फेकून निघून गेला.