शरद पवार

शरद पवार

शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

१९९९ साली वाजपेयींचं सरकार १३ महिन्यात कोसळलं तेव्हा शरद पवार हे विरोधी पक्ष नेते होते. त्यानंतर सत्तास्थापनेचं निमंत्रण त्यांना मिळायला हवं होतं. पण तसं झालं नाही. काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रं सोनिया गांधीच्या हातात गेली आणि परदेशी जन्माचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी काँग्रेसला रामराम केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. निवडणूक जवळ आली किंवा पवारांच्या उपस्थितीत कोणता कार्यक्रम असला तर शरद पवार हे पंतप्रधान झाले पाहिजे अशी वक्तव्य केले जातात. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१ आणि १९९३ ते १९९५ या दरम्यान शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पवारांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी बारामती येथे झाला. १९६७ च्या विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले आणि श्री. वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांना वयाच्या २९व्या वर्षी राज्यमंत्रीपद मिळालं. १९८४ ची लोकसभा निवडणूक पवारांनी लढवली आणि ते लोकसभेवर निवडून गेले.

२००४ मध्ये शरद पवार देशाचे कृषिमंत्री झाले. १ जुलै २०१० ला शरद पवार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष झाले. दरम्यानच्या काळात शरद पवारांवर अनेक आरोप देखील झालेत. २०१४ मध्ये शरद पवारांनी लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. सध्या ते राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले आहेत. २००९ मध्ये ते माढा मतदारासंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे या देखील बारामतीमधून खासदार आहेत. शरद पवारांची तिसरी पिढी आता राजकारणात येत आहे.

आणखी बातम्या

काका-पुतण्यात अबोला, अंतर मिटवण्यासाठी कोण पुढाकार घेणार?

काका-पुतण्यात अबोला, अंतर मिटवण्यासाठी कोण पुढाकार घेणार?

Sharad Pawar And Ajit Pawar: बारामतीत झालेल्या कृषी प्रदर्शनात शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर आले. मात्र दोन्ही नेत्यांनी एकमेकांकडे साधं पाहिलंसुद्धा नाही.

Jan 16, 2025, 20:52 PM IST
  शरद पवार अमित शहांबद्दल असं  म्हणाले तरी काय? भाजपने थेट लवासाची फाईल काढू असा इशारा दिला

शरद पवार अमित शहांबद्दल असं म्हणाले तरी काय? भाजपने थेट लवासाची फाईल काढू असा इशारा दिला

सध्या अमित शहा आणि शरद पवारांमध्ये चांगलीच जुंपलीय. अमित शहांनी शिर्डीतल्या भाजप अधिवेशनात शरद पवारांनी गद्दारीचं राजकारण केल्याचा आऱोप केला. त्यानंतर पवारांनी अमित शहांचं गुजरातमधलं बहुचर्चित

Jan 14, 2025, 21:36 PM IST
'शिवसेना झोपेतून उठायला तयार नाही तर काँग्रेस...'; अमोल कोल्हेंची पवारांसमोरच मित्र पक्षांवर टीका

'शिवसेना झोपेतून उठायला तयार नाही तर काँग्रेस...'; अमोल कोल्हेंची पवारांसमोरच मित्र पक्षांवर टीका

Sharad Pawar NCP Slams MVA Party UBT Shivsena Congress: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीत बिघाडी दिसून येत आहे.

Jan 10, 2025, 11:58 AM IST
शरद पवारांकडून पुन्हा संघाचं कौतुक, पवारांच्या मनात नेमकं काय?

शरद पवारांकडून पुन्हा संघाचं कौतुक, पवारांच्या मनात नेमकं काय?

शरद पवार यांनी पुन्हा आरएसएसच्या कामाचं कौतुक केलंय. त्यामुळे आता पवारांच्या मनात नेमकं काय आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालीये. 

Jan 09, 2025, 20:44 PM IST
राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्षपदावरून मतभेद? जंयत पाटील प्रदेशाध्यक्षपदी कायम राहणार का?

राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्षपदावरून मतभेद? जंयत पाटील प्रदेशाध्यक्षपदी कायम राहणार का?

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रदेशाध्यपदावरून पक्षामध्ये मतभेद असल्याचं समोर आलंय.

Jan 09, 2025, 19:49 PM IST
शरद पवारांचा पक्ष सत्तेत जाणार? तरुणांसमोर स्वत: खुलासा करत म्हणाले, 'जे सोबत येतील त्यांना...'

शरद पवारांचा पक्ष सत्तेत जाणार? तरुणांसमोर स्वत: खुलासा करत म्हणाले, 'जे सोबत येतील त्यांना...'

Sharad Pawar In Party Meet: मुंबईमध्ये तरुण पदाधिकाऱ्यांबरोबर शरद पवारांची बुधवारी बैठक पार पडली. त्यामध्येच त्यांनी पक्षाच्या भविष्यासंदर्भात भाष्य केलं.

Jan 09, 2025, 08:10 AM IST
NCP SP Two Days Review Meeting Today Sharad Pawar Jayant Patil To Attend

मुंबईत राष्ट्रवादी SP पक्षाची दोन दिवसीय आढावा बैठक

NCP SP Two Days Review Meeting Today Sharad Pawar Jayant Patil To Attend

Jan 08, 2025, 10:25 AM IST
'...म्हणून वेळीच खबरदारी घ्या', शरद पवारांचा CM फडणवीसांना सल्ला! पत्रात सुरेश धसांचाही उल्लेख

'...म्हणून वेळीच खबरदारी घ्या', शरद पवारांचा CM फडणवीसांना सल्ला! पत्रात सुरेश धसांचाही उल्लेख

Sharad Pawar Letter To CM Fadnavis: मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या विषयावरुन शरद पवारांचं फडणवीसांना पत्र

Jan 06, 2025, 12:30 PM IST
2025 मध्ये पवार काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवारांच्या आई हात जोडत म्हणाल्या, 'सगळे वाद...'

2025 मध्ये पवार काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवारांच्या आई हात जोडत म्हणाल्या, 'सगळे वाद...'

Maharashtra Politics Ajit Pawar Mother Wish: अजित पवारांच्या मातोश्री आशा पवार यांनी आज पंढरपुरमध्ये देवदर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी केलेलं विधान चर्चेचा विषय ठरतंय.

Jan 01, 2025, 10:48 AM IST