Gadar 3 : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा 'गदर 2' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. प्रदर्शित होताच चित्रपटानं अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. चित्रपटानं तीन दिवसात 100 कोटींचा आकडा पार केला तर चौध्या दिवशी चित्रपटानं 170 कोटींचा आकडा पार केला. चित्रपटानं चार दिवसात 173.88 कोटींची कमाई केली आहे. त्यानंतर आता चर्चा आहे की चित्रपटाचा तिसरा पार्ट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सगळ्या चर्चांवर आता सनी देओलनं प्रतिक्रिया दिली आहे.
झूमनं दिलेल्या रिपोर्टनुसार, 'गदरच्या तिसऱ्या भागाची तयारी ही शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीपासून सुरु होती. आता 'गदर 2' 22 वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर निर्माता झी स्टुडियो आणि दिग्दर्शक अनिल शर्मा हे 2024 च्या सुरुवातीला तिसरा भाग प्रदर्शित होईल यासाठी तयारी करत आहेत. शक्तिमान तलवार यांच्याकडे गरद या चित्रपटाच्या पुढच्या भागासाठी एक विचार देखील आहे.'
यासगळ्यात एका मुलाखतीत सनी देओल त्याच्या 'यमला पगला दीवाना', 'अपने' आणि 'गदर' च्या पुढच्या भागावर वक्तव्य केलं आहे. सनी याविषयी बोलताना म्हणाला की तिन्ही चित्रपटाची एक वेगळी स्पेस आहे आणि प्रेक्षकांना या तीनही चित्रपटांचा पुढचा भाग पाहायचा आहे. 'अपने 2' ची संपूर्ण तयारी झाली आहे. लवकरच आम्ही त्याच्या कामाला सुरुवात करण्याचा प्रयत्न करू. 'यमला पगला दीवाना' च्या पुढच्या भागासाठी चांगली पटकथा मिळत नाही आहे. त्यामुळे त्यावर मी अजून काही बोलू शकत नाही. प्रेक्षकांना 'गदर' चा तिसरा पार्ट हवा आहे. यावर आम्ही नक्कीच विचार करत आहोत.'
'गदर 2' चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, चित्रपटानं त्यांच्या अपेक्षे पेक्षा जास्त यश मिळवलं. सनी देओल फक्त तारा सिंग म्हणून परतले नाही तर त्यांनी चित्रपटसृष्टीतला एक लोकप्रिय अॅक्शन हीरो म्हणून स्वत: ची ओळख निर्माण केली. अनिल शर्मा यांचा मुलगा आणि अभिनेता उत्कर्ष शर्मानं सांगितलं की लेखकांनी त्याला मस्करीत म्हटलं होतं की 'गदर 3' विषयी एक वक्तव्य केलं होतं.
हेही वाचा : 'तो महिलांचा फायदा...', कंगना रणौतची जॉन अब्राहमबद्दलची पोस्ट चर्चेत
उत्कर्ष शर्मानं तो किस्सा पुढे सांगितला. तो म्हणाला की लेखक मस्करी करत म्हणाले की 'गदर 3' मध्ये जीतची मुलं होऊ शकतात. पण उत्कर्षनं ही गोष्ट खरंच गांभीर्यानं सांगितलं आणि पुढे म्हणाला की लेखकांकडे 'गदर 3' साठी काही आयड्या आहेत आणि त्यामुळे त्यावर चित्रपट बनवता येईल.