twinkle khanna dance video:ट्विंकल खन्ना 50 वर्षांची झाली आणि यानिमित्ताने अक्षय कुमारनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला अक्षय कुमारने लिहिले आहे, 'लोकांना वाटतं की माझी पत्नी अशी आहे...' त्यानंतर ट्विंकलला पुस्तक वाचताना आणि आराम करताना दिसते. परंतु नंतर व्हिडीओमध्ये ट्विंकल डान्स करताना दिसते आणि अक्षयने कॅप्शनमध्ये लिहिले, 'हॅपी बर्थडे, टीना. तू एक खेळ नाहीस; तू संपूर्ण स्पोर्ट्स आहेस. मी तुझ्याकडून खूप काही शिकलो आहे, पोट दुखेपर्यंत कसे हसायचे (आणि त्याचे कारण तु नेहमीच असशील)आवडीचे गाणे रेडिओवर वाजल्यावर मोकळेपणाने गाणं गाणे आणि नाचणे मला शिकवलेस.'
अक्षयने पोस्टमध्ये हार्ट इमोजीही शेअर केले आहेत. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी ट्विंकलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि तिच्या डान्सवर मजेशीर इमोजी पोस्ट केले. एका नेटकऱ्याने लिहिले, 'आतलं सत्य सांगितलं!' तर दुसऱ्या नेटकऱ्याने मजेशीर कमेंट केली, 'अरे राजू, मुलीचे अफेअर खूप वाईट आहे, पण आता ती तुझी बायको आहे.'
ट्विंकल खन्नाने तिच्या पतीच्या पोस्टला इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत लिहिले, 'आता कोणीही म्हणू शकत नाही की मी कंटाळवाणी आहे.'
ट्विंकल खन्नाची ओळख सुपरस्टार राजेश खन्ना आणि अभिनेत्री डिंपल कपाडिया यांची मुलगी म्हणून आहे. तिने 'मेला', 'बादशाह', 'बरसात' आणि 'इतिहास' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. यशस्वी करिअर असूनही, 2001 मध्ये अक्षय कुमारसोबत लग्न केल्यानंतर तिने अभिनय सोडला आणि लेखिका म्हणून नवा मार्ग निवडला. तिच्या लेखन क्षेत्रातही ती यशस्वी ठरली आहे. ट्विंकल आणि अक्षय कुमार यांच्या दोन मुलं आहेत - आरव आणि नितारा.
आज ट्विंकल खन्ना एक प्रसिद्ध लेखिका आणि बिजनेसवूमन म्हणून ओळखली जाते. तिच्या लेखनाच्या शैलीमुळे तिला लोकांची पसंती मिळाली आहे.