Farah Khan and Boman Irani : छोट्या पडद्यावरील सगळ्यांच्या आवडत्या आणि माहितीचा स्त्रोत म्हणणाऱ्या 'कौन बनेगा करोडपती 16' चं सुत्रसंचालन अमिताभ बच्चन करत आहेत. यंदाच्या एपिसोडमध्ये दिग्दर्शक फराह खान आणि अभिनेता बोमन इराणी यांनी हजेरी लावली होती. हास्य-विनोद, जुन्या आठवणी आणि हृदयस्पर्शी क्षणांनी भरलेला हा एपिसोड असेल. यावेळी फराह, बोमन इराणी आणि त्यासोबत अमिताभ यांनी अनेक मजेशीर आणि गमतीशीर विषयांवर चर्चा केली.
यावेळी फराह खाननं सांगितलं की "2014 मध्ये ‘हॅपी न्यू यर’ तिनं कोणताही चित्रपट केलेला नाही. कारण तिला अमिताभ बच्चनसोबत काम करण्याचा विचार ती करत आहे. कोणत्याही दिग्दर्शकाचा आलेख तोपर्यंत उंचावत नाही, जोपर्यंत ती टिक त्याला मिळत नाही आणि ती टीक त्या दिग्दर्शकाला तेव्हाच मिळते, जेव्हा तुम्ही अमितजींसोबत चित्रपट करता."
यावर अमिताभ बच्चन हसत हसत म्हणाले, "पुढचे प्रश्न सोपे यावेत या आशेने हे दोघे असं म्हणत आहेत. पण, तसं अजिबात होणार नाही."
आता बोमन इराणी देखील दिग्दर्शक झाले आहेत आणि आपापल्या चित्रपटात बिग बींना घेण्यासाठी आपण किती आतुर आहोत हे दाखवण्यासाठी फराह खान आणि बोमन इराणी यांनी अमिताभ बच्चन यांना अचानक चित्रपटाचा प्रस्ताव देऊन धक्का दिला. ते मस्करी करत म्हणाले, "सर, तुमच्यासाठी आमच्याकडे एका चित्रपटाची ऑफर आहे." फराहनं तिच्या खास विनोद शैलीत जाहीर केले की या चित्रपटाचे नाव असेल ‘जब तक बच्चन’ असे आहे कारण ‘जब तक सूरज चाँद रहेगा, बच्चन जी का नाम रहेगा!'
हेही वाचा : आईनं घेतलेलं 25 हजारांचं कर्ज फेडण्यासाठी अॅक्टिंग केली, मला कळलच नाही कधी स्टार बनलो!
हे ऐकताच बिग बींना आश्चर्य होतं आणि त्यांच्या उंचावलेल्या भुवया पाहून फराहने चित्रपटाला दुसरी कोणती नावं देऊ शकतो ही देखील सुचवली आहेत. जसे की, ‘बच्चन नंबर 1’ आणि ‘ओन्ली बच्चन’. त्यानंतर बिगी बी हसले आणि त्यांनी हसत हसत त्यांच्या कॉन्ट्रॅक्टच्या अटी आणि शर्ती वाचण्यास सुरुवात केली. या हलक्या-फुलक्या गप्पांमधून, त्यांनी केलेल्या कौतुकातून त्या दोघांना अमिताभ बच्चन या महानायकाविषयी असलेला आदर स्पष्ट दिसला. त्या दोघांच्या खास विनोदी बुद्धीनं प्रेक्षकांचे खूप मनोरंजन झाले. दरम्यान, शुक्रवारी अमिताभ बच्चन, फराह खान आणि बोमन इराणी हे मज्जा मस्ती करत खेळ खेळताना दिसत आहेत.