'... तो जिंदा हो तूम' कवितेच्या माध्यमातून फरहानचं जनतेला आवाहन

कोरोना व्हायरसचा धोका दिवसागणिक वाढताना दिसत आहे.  

Updated: Apr 17, 2020, 11:10 PM IST
'... तो जिंदा हो तूम' कवितेच्या माध्यमातून फरहानचं जनतेला आवाहन  title=

मुंबई :  कोरोना व्हायरसचा धोका दिवसागणिक वाढताना दिसत आहे. विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊचा कालावधी वाढवला आहे. कोरोनावर मात करायची असल्यास घरा बाहेर न निघण्याचं आवाहन सतत केलं जात आहे. अशा कठिण प्रसंगी बॉलिवूडकर देखील कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. त्यासोबतच ते सोशल मीडियावरही सक्रीय राहून चाहत्यांच्या संपर्कात राहत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते जनतेमध्ये जनजागृती निर्माण करण्याचं काम करत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

‘Toh Zinda ho tum’ - Corona version. #laughalittle #stayhome #poemsforourtimes

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar) on

सध्या अभिनेता गायक फरहान अख्तर कवितेच्या माध्यमातून व्यक्त झाला आहे. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटातील ‘तो जिंदा हो तुम’ ही कविता रिक्रिएट केलं आहे. या कवितेत त्याने मास्कचे फायदे, सतत हात धुवण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याचं हे गाणं तुफान व्हायरल होत आहे. 

‘चेहरों पर अगर मास्क पहन रहे हो तो जिंदा हो तुम… आताच्या महामारीच्या काळात तुम्ही स्वत:ला कशा प्रकारे वाचवू शकता. काय करायलं हवं आणि काय करायला नको अशा अनेक गोष्टी त्याने या कवितेच्या माध्यमातून सांगितल्या आहेत.