मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर आणि पत्नी मीरा राजपूत यांच दुसरं बाळ लवकरच येणार आहे. याची माहिती या दोघांनी स्वतः दिली आहे. जेव्हा पासून त्यांच दुसरं बाळ या जगात येणार आहे तेव्हापासून ते भरपूर चर्चेत राहिले आहेत. मीरा राजपूत तिच्या पहिल्या जाहिरातीमुळे चर्चेत आली तर बेबी बंप फ्लॉन्ट करताना देखील तिने फोटो काढले आहे. तिच्या या स्टाइलिश लूकमध्ये ती खूप चर्चेत राहिली.
आता त्यांच्या चाहत्यांना येणाऱ्या बाळाबद्दल जाणून घेण्यात अधिक उत्सुकता आहे. हल्लीच एका कार्यक्रमात मीराने आपल्या होणाऱ्या मुलाच्या नावाबद्दल सांगितलं. आम्ही अजूनपर्यंत बाळाचं नाव फायनल केलेलं नाही. आम्ही लोकांकडून याबाबत सजेशन देखील मागवत आहे. मीशा हे नाव शाहीदची पसंत होती. यामुळे तिला या बाळाचं नाव ठेवायचं आहे.
मीशा ही शाहिद आणि मीरा यांची पहिली मुलगी आहे. तिचं नाव या दोघांच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून तयार करण्यात आलं आहे. मीशाचा जन्म 26 ऑगस्ट 2016 रोजी झाला. मीरा सांगते की, आता माझी जबाबदारी वाढली आहे. येणाऱ्या बाळासोबतच मला मीशाची देखील काळजी घ्यायची आहे. कारण मीशा माझं पहिलं बाळ आहे तिच्याकडे दुर्लक्ष झालेल मला चालणार नाही.