Naga Chaitanya : दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य हा त्याच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहतो. सगळ्यात आधी तो आणि समांथा रुथ प्रभूसोबत होते तेव्हा सगळीकडे त्यांचीच चर्चा सुरु होती. त्यानंतर मग त्यांचा घटस्फोट आणि आता तो एका दुसऱ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा. नागा चैतन्य हा नेहमीच स्पष्ट बोलताना दिसतो. सध्या त्याच्या एका मुलाखतीतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत त्यानं रिलेशनशिपमध्ये फसवणुक करण्याबाबात त्याचं मत मांडलं आहे.
नागा चैतन्यचा हा एका जुन्या मुलाखतीतील व्हिडीओ सध्या 'रेडिट'वर व्हायरल होत आहे. नागा चैतन्यनं ही मुलाखत 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शैलजा रेड्डी अल्लुडू’ या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी दिली होती. यावेळी त्याच्यासोबत त्याची सहअभिनेत्री अनु इम्यॅनुअल सुद्धा होती. या मुलाखतीत त्याला प्रश्न विचारण्यात आला होता की त्यानं कधी एका वेळी दोघींना किंवा दोघांना डेट केलं आहे का? त्यावर नागा चैतन्यनं हो तर अनु इम्यॅनुअलसुद्धानं नाही असं उत्तर दिलं. नागाचं उत्तर पाहिल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य झालं तर त्यावर उत्तर देत नागा चैतन्य म्हणाला, "प्रत्येकानं आयुष्यात सगळ्याच गोष्टीचा अनुभव घेतला आहे. अशानंच तुमची प्रगती होते आणि त्यावरुन तुम्ही ठरवू शकता... आणि मी सर्व अनुभव घेतले आहेत त्यामुळे आता कुठेतरी स्थिरावण्याची वेळ आली आहे."
Naga Chaitanya admits to Cheating in the past, says “Everyone should experience everything!”
byu/Significant-Neat-142 inBollyBlindsNGossip
दरम्यान, जेव्हा नागा चैतन्यनं ही मुलाखत दिली तेव्हा तो आणि समांथा यांचं लग्न झालं होतं. त्यांच्या लग्नाविषयी बोलायचं झालं तर 2017 मध्ये नागा चैतन्य आणि समांथाचं लग्न झालं होतं. तर लग्नाच्या चार वर्षांनंतरही समांथा आणि नागा चैतन्य यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर समांथाला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. तिनं नागा चैतन्यला धोका दिल्याचे म्हटले. तर आता नागा चैतन्यचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
हेही वाचा : बाथरुममध्ये आई-मुलीचा मृतदेह कुजला..., 'त्या' अभिनेत्रीची गोष्ट जिची नोकरांनीच केली होती हत्या
त्या दोघांविषयी बोलायचे झाले तर नागा चैतन्य हा सध्या अभिनेत्री सोभिता धुलिपाला डेट करत असल्याचे म्हटले आहे. मात्र, त्या दोघांपैकी कोणीही यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. दुसरीकडे समांथाविषयी बोलायचं झालं तर ती सध्या स्वत: ला वेळ देत आहे. तिच्या आरोग्याकडे लक्ष देत आहे.