'रात्रीस खेळ चाले'फेम पांडू लॉकडाऊनमध्ये काय करतोय ?

 'झी २४ तास'च्या इंस्टाग्राम लाईव्हमध्ये त्याने प्रेक्षकांच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. 

& Updated: Apr 28, 2020, 01:51 PM IST
'रात्रीस खेळ चाले'फेम पांडू लॉकडाऊनमध्ये काय करतोय ?  title=

प्रविण दाभोळकर, झी २४ तास, मुंबई : लॉकडाऊनमध्ये सर्वजण आपापल्या घरात आहेत. अशावेळी आपला आवडता सेलिब्रेटी लॉकडाऊमध्ये काय करतोय याची सर्वांनाच उत्सूकता असते. सेलिब्रिटी देखील आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन आपण सध्या काय करतोय ? याची माहिती चाहत्यांना देत असतात. 'रात्रीस खेळ चाले'फेम पांडू आपल्या निरागस आणि विसरभोळ्या स्वभावामुळे प्रत्येकाच्या मनात घर करुन बसलाय. या लॉकडाऊनमध्ये तो सध्या काय करतोय ? असा प्रश्न सर्वांच्याच मनात होता. 'झी २४ तास'च्या इंस्टाग्राम लाईव्हमध्ये त्याने प्रेक्षकांच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रल्हाद कुडतरकरसोबत गप्पा @pralhadkudtarkar_official #zeemarathi #zee24taas #pralhadkudtarkar #pravindabholkar #ratriskhelchale2 @ratriskhelchale2020 @ratriskhelchalememe @ratris_khel_chale2_official @ratris_khel_chale_2__memes

A post shared by Pravin dabholkar (@pravin_dabholkr) on

प्रल्हादने लिहिलेल्या 'मेड फॉर इच अदर' एकांकीकेला अनेक पारितोषिकांनी गौरवले गेले. नवोदीत कलाकारांना घेऊन त्याने साकारलेली 'आयसीयू' एकांकिका देखील सर्वांच्याच लक्षात राहीली. त्याच्या 'मेड फॉर इच अदर' या नाटकाला 'झी गौरव'ने सन्मानित करण्यात आले. या सर्व आठवणी प्रल्हादन 'झी २४ तास'च्या इंस्टाग्राम लाईव्हमध्ये सांगितल्या. 

प्रल्हादने अभिनय केलेला 'सेल्फी' नावाचा लघुपट यूट्यूबवर लाखोवेळा पाहीला गेलाय. हा लघुपट निवडण्यामागचा किस्सा त्याने या लाईव्ह चॅटमध्ये सांगितला. भाग्यलक्ष्मी, का रे दुरावा, रात्रीस खेळ चाले, १०० डेज या मालिका त्याच्या उत्कृष्ट लिखाण आणि संवादामुळे लक्षात राहील्या. होम मिनिस्टर मालिकेसाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून देखील काम पाहीले आहे. 

तो सुरुवातीला राहत असलेल्या भोईवाड्यातील घराची, परळच्या मिलन हॉटेलमधील चहाचे मजेशीर किस्से त्याने यावेळी चाहत्यांना सांगितले. तसेच  'दंगल' ही त्याने लिहिलेली कवितेचे त्याने वाचन केले. लॉकडाऊनमध्ये आपण सध्या पुस्तकं वाचतोय, वेबसिरीज बघत असल्याचे त्याने सांगितले. लॉकडाऊन संपल्यानंतर लवकरच 'पांडू' आणि रात्रीस खेळ चालेचे सर्व कलाकार मालिकेतून सर्वांच्या भेटीला येतील असेही तो म्हणाला.