बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चोराने हल्ला केला आहे. या हल्ल्यात त्याच्यावर 6 वार झाले असून लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहे. डॉक्टर सैफवर सर्जरी करु असून अद्याप डॉक्टरांनी याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. रात्री 2.30 च्या सुमारास चोराने सैफवर हल्ला केला. त्यानंतर 3.30 पर्यंत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकरणात सैफच्या 3 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं. 12 वाजेपर्यंत सैफ अली खानचं मेडिकल बुलेटिन जाहीर केलं जाणार आहे.
सैफ अली खान हा पतौडी घराण्याचा 10 वा नवाब आहे. म्हणूनच त्यांना बॉलिवूडमध्ये 'छोटे नवाब' म्हणूनही ओळखले जाते. त्यांचा जन्म 16 ऑगस्ट 1970 रोजी नवी दिल्ली येथे झाला. सैफने यश चोप्रा यांच्या 'परंपरा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. पण त्याला खरी ओळख 'ये दिल्लगी' आणि 'मैं खिलाडी तू अनाडी' या चित्रपटांनंतर मिळाली. आतापर्यंत त्याने अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज त्याचे नाव बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत देखील समाविष्ट आहे. सैफकडे वडिलोपार्जित संपत्ती असण्यासोबतच त्याने स्वतःही भरपूर संपत्ती कमावली आहे.
सैफचे संपूर्ण कुटूंब चित्रपटसृष्टीशी जोडलेले आहे. त्यांची आई शर्मिला टागोर तिच्या काळातील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. बहीण सोहा आणि तिचा नवरा कुणाल खेमू हे देखील चित्रपटसृष्टीतील मोठे नाव आहेत. सैफची मुलगी सारा अली खान आणि त्याची पत्नी करीना कपूर यांनीही बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. सैफची जीवनशैली एखाद्या राजापेक्षा कमी नाही. सैफ अली खानच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, त्याची एकूण संपत्ती 150 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 1120 कोटी रुपये आहे. अहवालानुसार, गेल्या काही वर्षांत त्यांची संपत्ती 70 टक्क्यांनी वाढली आहे.
करीना कपूरची एकूण संपत्ती 485 कोटी रुपये आहे. ती भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. जो एका चित्रपटासाठी 10-12 कोटी रुपये घेतो. असे म्हटले जाते की, ती फक्त एका गाण्यासाठी 1.5 कोटी रुपये घेते. याचा अर्थ ती 4-5 मिनिटांच्या गाण्यासाठी 1.5 कोटी रुपये घेते.
अमृता सिंह ही 90 च्या दशकातील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री होती. मीडिया रिपोर्टनुसार, अमृता सिंहची एकूण संपत्ती जवळपास 15 मिलियन डॉलर आहे. 2019 मध्ये अमृताला अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू यांच्या 'बदला' या सिनेमात शेवटचं पाहण्यात आलं. या अगोदर अर्जून कपूर आणि आलिया भट्ट यांच्या 2 स्टेट्समध्ये पाहण्यात आलं.