मुंबईतून शालेय शिक्षण आणि न्यूयॉर्कमधून ग्रॅज्युएशन; जाणून घ्या किती शिकली आहे सारा अली खान?

प्रसिद्ध क्रिकेटर मन्सूर अली खान पतौडी यांची नात आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खान हिने 2018 च्या केदारनाथ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे.

Updated: Jul 18, 2022, 12:02 AM IST
मुंबईतून शालेय शिक्षण आणि न्यूयॉर्कमधून ग्रॅज्युएशन; जाणून घ्या किती शिकली आहे सारा अली खान? title=

मुंबई : प्रसिद्ध क्रिकेटर मन्सूर अली खान पतौडी यांची नात आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खान हिने 2018 च्या केदारनाथ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. सारा तिच्या सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करते.

सारा अली खानने फार कमी वेळात चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या अभिनयालाही चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळतं. तिने साकारलेल्या पात्रांवरून याचा अंदाज येतो. केदारनाथ चित्रपटात साकारलेली मुक्कूची भूमिका, सिम्बा चित्रपटात साकारलेली शगुन साठेची भूमिका, लव्ह आज कल या चित्रपटात साकारलेली किंवा अतरंगी रे  या चित्रपटात साकारलेली रिंकूची भूमिका आहे. साराने प्रत्येक पात्रात प्राण फुंकले आणि तिच्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावलं.

सारा अली खान केवळ चित्रपटांमध्येच हिट नाही, तर तिच्यासोबत आणखी एक उत्तम गुण म्हणजे ती हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात सुशिक्षित अभिनेत्रींपैकी एक आहे. सारा अली खानचं शालेय शिक्षण मुंबईतील बेसंट मॉन्टेसरी स्कूलमधून झालं आणि त्यानंतर तिने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून पुढील शिक्षण पूर्ण केलं.

तिच्या उच्च शिक्षणासाठी सारा अली खानने न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठाची निवड केली आणि येथून History आणि Political Science मधून ग्रॅज्यूएशन पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण केल्यानंतरच सारा बॉलिवूडकडे वळली.