'हे' Star couple बॉलिवूडपासून दूर.. डिवोर्सच्या बातम्यांना पुन्हा उधाण

मग अशावेळेस सगळ्यांना एकच प्रश्न पडतो तो म्हणजे हे आवडते जोडपे कुठे गायब आहे?

Updated: Oct 23, 2022, 05:26 PM IST
'हे' Star couple बॉलिवूडपासून दूर.. डिवोर्सच्या बातम्यांना पुन्हा उधाण title=
star couple away from bollywood divorce news resurfaces nz

Ranveer Singh and Deepika Padukone: सण असो या चित्रपट असो बॉलिवूडमध्ये पार्टीस मात्र जोरात होत असतात. पार्टी म्हटलं की बॉलिवूडमध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. एकापाठोपाठ एक अनेक स्टार्स त्यांच्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन करत आहेत. त्या पार्टीत बॉलिवूडचे दिग्गज कलाकार हजेरी लावताना दिसतात. मात्र, या पार्ट्यांमध्ये बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) गैरहजर राहणं हे मात्र न समजण्यासारखं आहे. मग अशावेळेस सगळ्यांना एकच प्रश्न पडतो तो म्हणजे हे आवडते जोडपे कुठे गायब आहे? त्याचवेळी सोशल मीडियावर रणवीर आणि दीपिकाच्या वेगळं झाल्याच्या अफवा पुन्हा उडू लागल्या आहेत. (star couple away from bollywood divorce news resurfaces nz)

 

हे ही वाचा - Malaika Arora Birthday : मलायकाच्या वाढदिवसानिमित्त 'हा' धक्कादायक किस्सा आला समोर, जाणून घ्या

 

 

Ranveer Singh आणि Deepika Padukone गायब

दिवाळी पार्टीत लोक रणवीर आणि दीपिका पदुकोणला खूप मिस करत आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी रणवीरचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये तो मुंबई विमानतळाच्या आत जाताना दिसत होता. हे लक्षात घेण्यासारखे आहे की दीपिका आणि रणवीरच्या वेगळं झाल्याची अफवा यापूर्वी देखील उडाली होती, ज्यावर या जोडप्याने प्रतिक्रिया दिली आणि अफवांचे खंडन केले. मात्र अनेक दिवसांपासून कॅमेऱ्यापासून दूर असलेल्या दीपिका आणि रणवीरच्या जोडीची बॉलिवूडला मात्र कमतरता भासू लागली. 

 

 

हे ही वाचा - Prabhas Birthday: प्रभासला कधीच अभिनेता बनायचं नव्हतं,पण... 

 

बॉलिवूडमध्ये पार्टीला जोर

 

.
अलीकडेच, निर्माता रमेश तौरानी, ​​डिझायनर मनीष मल्होत्रा, आनंद पंडित यांसारख्या अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी दिवाळी पार्टी आयोजित केली होती. या पार्ट्यांमध्ये जवळपास सर्वच स्टार्सनी एन्ट्री घेतली. विकी कौशल-कतरिना कैफ, अभिषेक-ऐश्वर्यासह अनेक स्टार्सने दिवाळी पार्टीला हजेरी लावली. मात्र आतापर्यंत रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण कोणत्याही पार्टीत दिसले नाहीत. अशा परिस्थितीत चाहते थोडे निराश झाले आहेत आणि अनेकांनी असा अंदाजही बांधला आहे की त्यांच्यामध्ये सर्व काही ठीक नाही. पण असे काही नसून त्यांच्यामध्ये सर्वकाही ठिक आहे.