मुंबई : केळे खावून आपण केळ्याची साल अगदी सहज फेकून देतो. पण तुम्हाला माहित आहे का? केळ्याची साल अत्यंत फायदेशीर असते. केळ्याच्या सालीचे हे फायदे जाणून घ्या. त्यानंतर केळ्याची साल फेकण्याची चूक तुम्ही करणार नाही.
#1. दातांची चमक गेली असल्यास केळ्याच्या सालीच्या मदतीने ती पुन्हा आणता येईल. केळ्याची साल दातांवर घासा. असे दिवसातून दोनदा करा आणि फरक पहा.
#2. काही वेळेस किडा, मुंगी चावल्याने त्वचा लाल होते. त्वचेवर चकत्ते येतात, जळजळ होते. अशावेळी त्यावर केळ्याची साल हलक्या हाताने चोळा. दुखण्यावर आराम तर मिळेलच पण त्याचबरोबर डाग, चकत्ते, लालसरपणाही दूर होईल.
#3. केळ्याची साल चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर त्वचेचे पोषण होते आणि त्वचेतील ओलावा टिकून राहतो.
#4. केळ्याची साल अंड्याच्या सफेद भागात घालून मिक्सरमध्ये वाटा आणि ते मिश्रण चेहऱ्यावर लावा. काही आठवडे असे नियमित केल्याने सुरकुत्या दूर होण्यास मदत होते.
#5. चेहऱ्यावरील किंवा शरीरावरील चामखीळीमुळे त्रस्त असाल तर केळ्याची साल नियमित त्यावर लावा. चामखीळीचा त्रास दूर होईल.
#6. इतकंच नाही तर केळ्याच्या सालीने बुट किंवा लेदरच्या वस्तूंना चमक येईल.